ऑनलाईन शॉपिंग करताय? पैसे वाचविण्याच्या महत्वाच्या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन शॉपिंग करताय? पैसे वाचविण्याच्या महत्वाच्या टिप्स

ऑनलाईन शॉपिंग करताय? पैसे वाचविण्याच्या महत्वाच्या टिप्स

-भावना बाटीया

शॉपिंग म्हणजेच खरेदी हा देखील एक छंद असू शकतो. हे वाचून तुम्हाला देखील विशेष वाटू शकते, पण अनेकांना खरेदी करायला प्रचंड आवडते. पूर्वी लोक मॉल आणि बाजारपेठेत जाऊन वस्तू पाहून त्या खरेदी करत, पण अनेक लोक आता ऑनलाइन शॉपिंग करतात. दिवसभर सर्फिंग करून अनेक आवडलेल्या वस्तू कार्टमध्ये सेव्ह करून ठेवतात आणि खरेदी करतात. ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टीची काळजी घ्यायला हवी.

काहींना उन्हात फिरून प्रत्येक दुकानात फिरून खरेदी करायला आवडत नाही असे लोक निवांत घरी बसून ऑनलाइन शॉपिंग करतात. सर्वात आधी ऑनलाइन शॉपिंगसाठी एखादे अ‍ॅप डाउनलोड करावे लागते. सध्या अनेक अ‍ॅपचे पर्याय उपलब्ध आहेत. अ‍ॅपवर शॉपिंग करताना सेल किंवा काही ऑफर असताना शक्यतो तेव्हाच शॉपिंग करावी. दिवाळी, दसरा, पंधरा ऑगस्ट यावेळेस नेहमी सेल असतात. सेल असतात तेव्हा तुम्हाला सामान MRPपेक्षा कमी किंमती मिळते.

हेही वाचा: पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’

  • एखादी वस्तू खरेदी करताना ती वस्तू कोणत्या ब्रँडची आहे, त्यांची किंमत, त्या वस्तूचा रंग या सर्व बाबी नीट वाचून घ्या.

    पेमेंट करताना अनेक पर्याय असतात, जसे की कार्ड, क्रेडिट कार्ड -डेबिट कार्ड हे पर्याय असतात. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी हा देखील पर्याय असतो. शक्य असेल तेव्हा शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय वापरावा. कारण तो सर्वाधिक सुरक्षित पर्याय आहे.

  • कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूला रिटर्न हा पर्याय आहे का? हे नक्की पाहा कारण काही वस्तूंना रिटर्न हा पर्याय नसतो. त्यामुळे जर एखादी वस्तू तुम्हाला आवडली नाही तर मात्र तुम्ही ती वस्तू रिटर्न करू शकता.

  • ऑनलाइन शॉपिंग करताना फसवेगिरी देखील फार होऊ शकते, त्यामुळे काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. तरच आपण ऑनलाइन शॉपिंगचा घरबसल्या आनंद घेऊ शकतो. http पासून सुरू होणाऱ्या लिंक्स आणि वेबसाईटच्या माध्यमांतून शक्यतो खरेदी करावी. कारण अशा वेबसाईट सेक्युअर असतात. नाहीतर तुमचा पत्ता, क्रेडिट कार्ड आणि बँकची माहिती हॅक होऊ शकते.

  • इंटरनेट फिशिंगमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे वेबसाईटची सेक्युरिटी योग्य असल्याची माहिती खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण करू नये. वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसी वाचून मगच खरेदी करा. एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूंच्या किंमती इतर एक दोन वेबसाईटवर तपासून पाहा. नाहीतर कधी- कधी तुम्हाला किंमतीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतील. इतर वेबसाईटवर काही छुपे चार्जेस देखील असतात. त्यांची देखील खात्री करून घ्यावी. पेमेंट क्रेडिट कार्डने असल्यास इतर पर्यायांपेक्षा जरा सुरक्षित असते कारण तुमचा काही तोटा झाल्यास, तोटा नक्कीच कमी होतो.

हेही वाचा: फक्त 200 रुपयांची बचत करा, 18व्या वर्षी मुलाच्या अकाऊंटमध्ये असतील 20 लाख

  • स्वत:बद्दल कमीत कमी माहिती द्या - काही वेबसाईटवर खाजगी माहिती गोळा करण्यासाठी देखील प्रश्नमंजूषा पॉपअप होत असते. तेथे तुमची इतर जादाची माहिती देऊ नका.

  • भरपूर ईमेल अकाऊंट बनवा - अनेक ऑनलाइन वेबसाईट पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भरपूर सूट आणि काही कुपन्स देखील देतात. काही वेबसाईट पहिल्यांदा खरेदी केल्यावर ''फ्री होम डिलेव्हरी'' देखील देतात, त्यामुळे जर तुमच्याकडे 1-2 नवीन ईमेल आयडी असतील तर नक्कीच तुम्हाला ते आयडी वापरुन फायदा करून घेता येऊ शकतो. कारण तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर जेव्हा खरेदी करता तेव्हा ईमेलच्या माध्यमांतून तुम्हाला त्या साईटवर लॉग इन करावे लागते. त्यामुळे तुम्ही तुमचे दोन - तीन ईमेल आयडी काढून ठेवा. त्यांचा नक्की फायदा होऊ शकतो.

  • कॅश बॅक - अनेक ऑनलाइन वेबसाईट त्यांच्या येथे खरेदी केल्यानंतर अनेक कुपन्स आणि कॅश बॅक देतात. त्यामुळे कोणतेही प्रॉडक्ट घेताना त्यावर काही कॅश बॅक आहे हे नक्की तपासून पहा. अनेकदा 50 टक्क्यांपर्यत कॅश बॅक येते.

Web Title: Do You Shop Online Follow Important Tips To Save Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top