esakal | डॉक्‍टरांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण
sakal

बोलून बातमी शोधा

doctor-health-checkup

‘सकाळ मनी’च्या वतीने डॉक्‍टरांसाठी ‘वेल्थ चेकअप’ उपक्रम आयोजित केला जात आहे. यात ‘सकाळ मनी’चे तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार डॉक्‍टरांना आर्थिक अथवा गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासंदर्भात सोप्या शब्दांत मार्गदर्शन करणार आहेत.

डॉक्‍टरांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोज रुग्णांच्या निदान व उपचारात मग्न असल्याने किंवा पुरेशा वेळेअभावी अनेक डॉक्‍टर स्वतःचे आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन करण्यात कमी पडतात. त्यामुळे येणाऱ्या पैशाचे व्यवस्थित नियोजन होत नाही. परिणामी, स्वतःची ‘ओपीडी’ सुरू करणे, नव्या हॉस्पिटलची उभारणी करणे किंवा अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी करणे जिकिरीचे बनते. वैद्यकीय पेशात कार्यरत असणाऱ्या शहरी भागातील बहुतांश डॉक्‍टरांशी संवाद साधल्यानंतर, त्यांना आपल्या गुंतवणुकीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याचे जाणवले. या पार्श्‍वभूमीवर, ‘सकाळ मनी’ने खास डॉक्‍टरांसाठी खास उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला तंदुरुस्त राहण्यासाठी ‘हेल्थ चेकअप कॅम्प’सारखे उपक्रम राबविले जातात; त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सुदृढ असण्यासाठी ‘सकाळ मनी’च्या वतीने डॉक्‍टरांसाठी ‘वेल्थ चेकअप’ उपक्रम आयोजित केला जात आहे. यात ‘सकाळ मनी’चे तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार डॉक्‍टरांना आर्थिक अथवा गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासंदर्भात सोप्या शब्दांत मार्गदर्शन करणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी सीनिअर डॉक्‍टरांकडे प्रॅक्‍टिस करणे किंवा एखाद्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये नोकरी करणे हा साधारणतः कोणत्याही डॉक्‍टरच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतो. त्यानंतर स्वतःची ‘ओपीडी’ सुरू करणे किंवा स्वतःचे हॉस्पिटल उभारणे, हे सर्वसाधारण टप्पे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्‍टर पार करतात. मात्र, हॉस्पिटल उभारणी किंवा अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी करणे, हे खर्चीक आणि आव्हानात्मक असते. मुळातच अतिशय महागडे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पैशांची परतफेड करताना दमछाक झालेली असते. दरम्यानच्या काळात लग्न आणि वैयक्तिक आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठीचा खर्च वेगळाच. एवढे सगळे करून पुढची पिढी डॉक्‍टरकीच्या पेशात असेल तर उत्तम; अन्यथा हॉस्पिटल भाड्याने देणे हे क्रमप्राप्त. त्यामुळे हा सगळा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्‍यक ठरते.  

शिक्षणासाठी किंवा हॉस्पिटल उभारणीसाठी पैशांची जुळवाजुळव म्हणजे कर्ज प्रकरण अगदी अनिवार्य असल्यासारखेच आहे. त्यात चुकीचे असे काहीच नाही. मात्र, कर्जाची लवकरात लवकर परतफेड करून उरलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतविणे गरजेचे असते. त्यामुळे वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील व्यवस्थित पेलता येतात. यासाठी म्युच्युअल फंडासह गुंतवणुकीचे विविध पर्याय काय असू शकतात किंवा कर्ज आणि गुंतवणूक हा आर्थिक ताळेबंद कसा साधायचा, यासाठी ‘सकाळ मनी’ प्रत्यक्ष डॉक्‍टरांना मार्गदर्शन करणार आहे. येत्या शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) हा कार्यक्रम पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात आयोजित केला जाणार आहे.

भांडवली बाजाराचा १८ वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ सल्लागार गिरीश हर्णे तसेच मिरे ॲसेट ग्लोबल इन्व्हेस्टमेंट्‌सचे (मिरे ॲसेट म्युच्युअल फंड) तज्ज्ञ हे डॉक्‍टरांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यास सज्ज आहेत. यासाठी डॉक्‍टरांनी सोबतच्या चौकटीत नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल देऊन ठेवावा. नंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधून तपशील दिले  जातील.