esakal | LPG Cylinder Price: ऑक्टोबरमध्ये गॅस दराचा भडका; जाणून घ्या किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Cylinder Price

ऑक्टोबरमध्ये गॅस दराचा भडका; जाणून घ्या किंमत

sakal_logo
By
शरयू काकडे

LPG Gas Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडरची किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यावेळी ही वाढ 19 किलो कमर्शिअर सिंलेडरवर झाली आहे. आज 1 ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1693 रुपयांपासून वाढून 1730.50 रुपये इतकी झाली आहे. कमर्शिअल सिलेंडरची किंमत 43 रुपयांनी वाढली आहे. तर नॉनसबसिडीचे घरगुती सिलेंडरची किंमत 884.50 रुपये झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ पाहता LPG सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

हेही वाचा: उत्तर प्रदेश : आणखी एका मनिषचा बळी; फ्री दारु न दिल्याने मारहाण

सप्टेंबर महिन्याच्या सुरवात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला होता. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती LPG सिलेंडरचे किंमती पुन्हा वाढल्या आहे. नॉन-सबसिडीच्या घरगुती सिलेंडरच्या किंमती 1 सप्टेंबरपासून 25 रुपयांनी वाढविली होती. जुलैमध्ये सिलेंडरचे दर वाढविण्यात आले होते. तर 19 किलोगॅम कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दप 75 रुपयांनी वाढविले आहेत.

जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती गॅसच्या किंमती

मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम LPG सिलेंडरची किंमत 884.5 रुपये आहे तर चेन्नईमध्ये LPG सिलेंडरचा दर 900.50 रुपये आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये LPG सिलेंडरचे किंमत 897.5 रुपये आहे.

हेही वाचा: मान्सूनचा परतीचा प्रवास ६ ऑक्टोंबरपासून - IMD

1 जानेवारी ते 1 सप्टेंबरपर्यंत घरगुती गॅसती किंमत 190 रुपयांनी वाढली आहे. तर 19 किलोग्रॅमवाले कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1693 रुपये ,कोलकत्त्यामध्ये 1772 रुपये , मुंबईत 1649 रुपये, आणि चेन्नईमध्ये 1831 रुपये प्रति सिलेंडर इतकी आहे.

सरकारने दर महिन्याला भाववाढ करून LPG वर मिळणारी सबसिडी बंद केली आहे. दरमहिन्याला वाढणाऱ्या किंमती पाहता 2020 पर्यंत सबसिडी संपली होती. घरगुती गॅसची किंमत गेल्या 7 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. 1 मार्च 2014 ला 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरची किंमत 410.5 रुपये इतकी होती.

loading image
go to top