esakal | उत्तर प्रदेशात आणखी एका मनिषचा बळी; फ्री दारु न दिल्याने मारहाणीत मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर प्रदेश : आणखी एका मनिषचा बळी; फ्री दारु न दिल्याने मारहाण

उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यावेळी झालेल्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत असताना आणखी एकाची हत्या झाली आहे.

उत्तर प्रदेश : आणखी एका मनिषचा बळी; फ्री दारु न दिल्याने मारहाण

sakal_logo
By
सूरज यादव

उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यावेळी झालेल्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत असताना आणखी एकाची हत्या झाली आहे. रामगढताल परिसरात गुरुवारी हिस्ट्रीशीटरचा भाऊ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका शॉपमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोफत दारू देण्याच नकार दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात त्याला मारहाण करण्यात आली होती. हॉकी आणि काठ्यांनी ही मारहाण केली होती. कर्मचाऱ्याला हल्लेखोरांच्या हातून सोडवण्यासाठी गेलेल्या इतर लोकांनासुद्धा मारहाण केली गेली.

हल्लेखोर मारहाण केल्यानंतर फरार झाले. त्यानंतर दोन जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णांची गंभीर अवस्था पाहून त्यांना मेडिकल कॉलेजला हलवण्यात आलं. दोघांपैकी एकाचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. पोलिस आता आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: जम्मू -काश्मीर :शोपियानमध्ये चकमक; 1 दहशतवाद्याचा खात्मा

मारहाण करणाऱ्या आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. महराजगंज इथं राहणाऱ्या नागेंद्र प्रताप सिंह यांचा रामगढताल पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरदायिनीजवळ मॉडेल शॉप आहे. या शॉपमधेय कोतवाली भागातील हिस्ट्रीशीटरचा भाऊ त्याच्या सहकाऱ्यांसह आला होता. ऑर्डर घेण्यासाठी आलेल्यांकडे कर्मचाऱ्याने पैसे मागितले आणि पैसे दिल्याशिवाय दारु मिळणार नाही असे सांगितले. यामुळे रागावलेल्या हिस्ट्रिशीटरने मारहाण करण्यास सुरुवात केली. वेटरसह कर्मचाऱ्यांना झालेल्या या मारहाणीत मनिष प्रजापती याचा मृत्यू झाला आहे.

loading image
go to top