फेसबुक, गुगल आणि ट्विटरला ट्रम्प यांच्याकडून धमकी 

वृत्तसंस्था
Thursday, 27 June 2019

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफ्रॉर्म असणाऱ्या फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर खटला चालविण्याची धमकी दिली आहे. ट्रम्पने या कंपन्यांना धमकी देत म्हटले आहे की, ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध राजकीय पक्षपात करीत आहेत. शिवाय रिपब्लिकन पक्षाविरुद्ध लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवत आहेत. 

बुधवारी फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प बोलत होते. फेसबुक, गुगल आणि ट्विटर हे सर्व डेमोक्रॅट आहेत. शिवाय ते डेमोक्रॅटला मदत करत असून एकप्रकारे समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. ते म्हणाले युरोपियन युनियनने देखील ऍपल आणि गुगल सारख्या कंपन्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. ईयूच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुगलला 1.7 अब्ज अमेरिकी डॉलरचा दंड आकारला होता. 

विशेषत: ट्विटरवर  ट्रम्प यांनी आगपाखड केली आहे. ट्रम्प म्हणाले, 'ट्विटर माझ्यासोबत चुकीचा व्यवहार करते आहे. माझे लाखो फॉलोअर्स आहेत, पण ट्विटर त्यांना माझ्यापर्यंत पोहचू देत नाहीत. लोक मला (ट्विटरवर) फॉलो करण्यासाठी खूप मेहनत घेतात, परंतु ट्विटरने त्यांना रोखले आहे. जर मी डेमोक्रॅट असतो तर माझे सध्या असलेल्या फॉलोअर्सच्या पाचपट फॉलोअर्स असते.' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump Says U.S. Should Sue Facebook and Google