‘जीएसटी’अंतर्गत ‘क्यूआरएमपी’ योजना 

डॉ. दिलीप सातभाई (चार्टर्ड अकाउंटंट) 
Monday, 21 December 2020

नवा पर्याय नक्कीच स्वागतार्ह आहे व करदात्यांचा मानसिक ताण व अनुपालन नक्कीच कमी करणारा आहे. वस्तू व सेवाकर कायदा कालपरत्वे परिपक्व होत आहे, तो लवकरच ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’, होईल यात शंका नाही. 

दरमहा भराव्या लागणाऱ्या वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) विवरणपत्राऐवजी आता तिमाही रिटर्न भरण्याची सवलत आणि प्रत्येक महिन्यातील उलाढालीवरील ‘जीएसटी’ दरमहा भरण्याची सुविधा देणारी ‘क्यूआरएमपी’ योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेमुळे ९२ टक्के करदात्यांना लाभ होणार असून, त्यांचे कारकुनी स्वरूपाचे काम कमी होणार आहे. ही योजना केवळ संकेतस्थळावर नोंदविलेल्या बीजकांवर आधारित रकमेवरच ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मान्य करणार असल्याने बनावट बीजकाद्वारे होणाऱ्या सरकारच्या फसवणुकीच्या धोक्यावर अंकुश ठेवला जाणार आहे. नवा पर्याय नक्कीच स्वागतार्ह आहे व करदात्यांचा मानसिक ताण व अनुपालन नक्कीच कमी करणारा आहे. वस्तू व सेवाकर कायदा कालपरत्वे परिपक्व होत आहे, तो लवकरच ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’, होईल यात शंका नाही. 

कधी लागू होणार व कोण लाभार्थी? 
१. ही योजना १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार. 
२. ज्या करदात्यांची गेल्या आर्थिक वर्षातील उलाढाल पाच कोटीं रुपयांपेक्षा कमी आहे. 
३. चालू आर्थिक वर्षाच्या कोणत्याही तिमाहीत एकूण उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्यास, नोंदणीकृत व्यक्ती पुढील तिमाहीत अपात्र. ही योजना पर्यायी असणार आहे. 

योजनेचा पर्याय स्वीकारताना... 
१. ‘जीएसटीआर-३बी’ तिमाही दाखल करण्याची सूचना करदात्याने जीएसटी पोर्टलवर आधीच्या तिमाहीच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पुढील तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सूचित करणे आवश्यक. उदाहरणार्थ, जानेवारी-मार्च २०२१ च्या तिमाहीसाठी त्याने १ नोव्हेंबर २०२० आणि ३१ जानेवारी २०२१ दरम्यान पर्याय निवडणे आवश्यक. 
२. एकदा तिमाही फाइलिंगचा पर्याय निवडल्यानंतर, काही परिस्थिती वगळता, पुढील सर्व कालावधीसाठी दर तिमाहीत त्याने विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक. 
३. नवा पर्याय ज्या तारखेला स्वीकारला असेल, त्यावेळी त्या तारखेच्या अगोदरच्या महिन्याचे देय विवरणपत्र दाखल केले नसल्यास, तो करदाता नवा तिमाही पर्याय निवडण्यास अपात्र. उदाहरणार्थ, १ डिसेंबर २०२० रोजी त्रैमासिक पर्याय निवडला असेल, तर ऑक्टोबर २०२० महिन्याचे ‘जीएसटीआर-३बी’ रिटर्न भरलेले असणे आवश्यक. 
४. उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत असणाऱ्या छोट्या करदात्यांनी तिमाही योजनेची निवड केली असेल, तर त्यांना पोर्टलवरील ‘बीजके दाखल करण्याची सुविधा’ उपलब्ध. 
५. खालील बाबी जीएसटी विभाग गृहीत धरणार - 

अर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं;मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का?

‘जीएसटी’ कसा भरावा लागेल?
१. पुढील महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जीएसटी ‘पीएमटी -०६’ फॉर्मद्वारे तिमाहीच्या पहिल्या आणि दुसऱ्‍या महिन्यातील कर जमा करावा लागेल. 
२. करदाता त्यांचे मासिक करदायित्व एकतर निश्चित रक्कम पद्धत किंवा स्वयंनिर्धारण पद्धतीचा वापर करून भरू शकतात. 
३. निश्चित रक्कम पद्धतीमध्ये गेल्या तिमाहीच्या एकूण कराच्या ३५ टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. 
  
तिमाही ‘जीएसटीआर-३बी’ दाखल करण्याच्या तारखा 
तिमाही ‘जीएसटीआर-३बी’ विलंबशुल्कविना दाखल करण्याच्या तारखा बहुतेक राज्यांत तिमाही संपल्यानंतर येणारी २२ तारीख, तर काही राज्यात २४ तारीख आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

व्याज आकारणी 
१. पूर्व-भरलेल्या जीएसटी ‘पीएमटी-०६’ फॉर्म मध्ये उल्लेखीत कर पुढील महिन्याच्या २५ तारखेपर्यंत भरला नसल्यास, २६ तारखेपासून देय तारखेपर्यंत १८ टक्के व्याज. 
२. पहिल्या दोन महिन्यांकरिता पूर्व-भरलेल्या जीएसटी ‘पीएमटी-०६’ फॉर्ममधील कर रक्कम ‘जीएसटीआर-३बी’ भरण्याच्या मुदतीच्या आत भरलेली नसल्यास,२२ किंवा २४ तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम भरेपर्यंतच्या तारखेपर्यंत १८ टक्के व्याज 

विलंब शुल्क 
तिमाही ‘जीएसटीआर-३बी’ मुदतीत दाखल न झाल्यास विलंब कालावधीसाठी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक नसणारे विलंब शुल्क लागणार. कर भरण्यास विलंब झाल्यास व्याज. 

क्र. कोणता कायदा? विलंब शुल्क प्रती दिन शून्य करदायित्व असताना लागणारे विलंब शुल्क 
१ सीजीएसटी एसजीएसटी रु.२५ रु.१० 
२. आयजीएसटी रु.५० रु.२० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Dilip Satbhai write article about QRMP scheme under GST

Tags
टॉपिकस
Topic Tags: