esakal | पीई घसरला…सुज्ञ गुंतवणूकदार सरसावला!
sakal

बोलून बातमी शोधा

pe-ratio

एखाद्या शेअरचा सध्याचा बाजारभाव शंभर रुपये आहे आणि प्रतिशेअर उत्पन्न वीस रुपये असेल तर त्याचा 'पीई' पाच येईल. 

पीई घसरला…सुज्ञ गुंतवणूकदार सरसावला!

sakal_logo
By
डॉ. वीरेंद्र ताटके

पडलेला बाजार गुंतवणुकीची नवीन संधी उपलब्ध करून देत असतो. यासाठी 'प्राईस अर्निंग रेशो'चा (पीई रेशो) दाखला दिला जातो. 'पीई रेशो' बाजार किती महाग आहे हे दर्शवित असतो. प्रत्येक कंपनीच्या शेअरसाठी 'पीई रेशो' स्वतंत्रपणे मोजता येतो. तसेच, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स किंवा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीसाठीही तो मोजता येतो. शेअरचा 'पीई' आपल्याला शेअरच्या बाजारभावाला शेअरच्या प्रतिशेअर उत्पन्नाने (ईपीएस) भागून मिळतो. उदाहरणार्थ, एखाद्या शेअरचा सध्याचा बाजारभाव शंभर रुपये आहे आणि प्रतिशेअर उत्पन्न वीस रुपये असेल तर त्याचा 'पीई' पाच येईल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअर बाजारातील प्रत्येक कंपनीचा 'पीई रेशो' मोजला जातो आणि त्याची माहिती गुंतवणूकदारांना दिली जाते. दिलेल्या 'पीई रेशो'चा अर्थ लावून त्यानुसार आपण आपला गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा असतो. एखाद्या शेअरचा 'पीई'  खूप वाढतो, तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ म्हणजे तो शेअर खूप महाग झाला आहे आणि दुसरा म्हणजे नजीकच्या भविष्यात त्या शेअरकडून गुंतवणूकदारांच्या खूप अपेक्षा आहेत. याउलट शेअरचा 'पीई' खूप कDr. Virendra Tatke price earnings ratio : एखाद्या शेअरचा सध्याचा बाजारभाव शंभर रुपये आहे आणि प्रतिशेअर उत्पन्न वीस रुपये असेल तर त्याचा 'पीई' पाच येईल. मी असतो त्यावेळी तो शेअर खूप स्वस्त झाला आहे आणि त्या शेअरकडून नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांच्या फारशा अपेक्षा नाहीत. जेव्हा एखाद्या शेअरचा बाजारभाव अल्पावधीत वर जातो किंवा अल्पावधीत कोसळतो तेव्हा त्याचा परिणाम 'पीई'वर होतो.

जेव्हा निर्देशांक खूप वेगाने वर जातो तेव्हा 'पीई'सुद्धा खूप वर जातो. याचाच अर्थ म्हणजे बाजारातील बहुसंख्य शेअर महाग झाले आहेत. याउलट निर्देशांक जेव्हा कोसळतो तेव्हा 'पीई' एकदम कमी होतो म्हणजेच बाजारातील बहुसंख्य शेअर स्वस्त झाले आहेत. 

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सेन्सेक्सचा सरासरी 'पीई' 27 च्या आसपास पोचला होता. काही महिन्यांमध्ये तर तो 29 जवळ पोचला होता. यावरून भारतीय शेअर बाजार किती महाग झाला होता हे आपल्या लक्षात येईल. मात्र, मार्च महिन्यात जेव्हा शेअर बाजार कोसळला तेव्हा, सेन्सेक्सचा 'पीई रेशो' घसरून 18 च्या आसपास आला होता. सोप्या शब्दांत असे म्हणता येईल की ज्या वस्तूची किंमत वर्षभरात सरासरी 27 रुपये होती तीच वस्तू आता 18 रुपयांपेक्षा कमी किंमतीला उपलब्ध आहे.

गुंतवणुकीसाठी अशी संधी सतत येत नाही. अर्थात अशावेळी एकरकमी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा टप्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल.  'फंडामेंटली' मजबूत मात्र, 'पीई' कमी असलेले शेअर, तसेच 'डायव्हर्सिफाइड' आणि 'इंडेक्स' म्युच्युअल फंड अशा वेळी गुंतवणुकीची योग्य संधी निर्माण करून देतात.

थोडक्यात, 'पीई' घसरला की सुज्ञ गुंतवणूकदाराने गुंतवणुकीसाठी सरसावले पाहिजे.

loading image