Mutual Fund SIP : वेल प्लेड एसआयपी!

चालू वर्षातील गुंतवणुकीच्या सामन्यात भारतीय म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’ संघाने अष्टपैलू कामगिरी केली
Mutual Fund SIP
Mutual Fund SIPsakal

https://www.youtube.com/watch?v=625HfM1A6ZEचालू वर्षातील गुंतवणुकीच्या सामन्यात भारतीय म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’ संघाने अष्टपैलू कामगिरी केली आहे. खरंतर २०२२ वर्षाची सुरूवात कोरोनाच्या सावटाखाली झाली होती. यामुळेच वर्षाच्या सुरूवातीला ६०,०००च्या आसपास असलेला ‘सेन्सेक्स’ दोन-तीन महिन्यात खालच्या पातळीवर घुटमळायला लागला. याचा विपरीत परिणाम ‘एसआयपी’ संघाच्या कामगिरीवर झाला, मात्र वर्षाच्या शेवटच्या काही षटकांत या संघाने जोरदार पुनरागमन करत आपली कामगिरी सुधारली.

कोणत्याही खेळाडूची एखाद्या सामन्यातील कामगिरी पाहून त्याचे मूल्यमापन करण्याऐवजी गेल्या काही सामन्यात तो कसा खेळला हे पाहावे. म्हणूनच गेल्या तीन वर्षांत ‘एसआयपी’ संघातील काही प्रमुख खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यावर एक नजर टाकुया.

इक्विटी फंड : ‘एसआयपी’ संघातील हा अत्यंत आक्रमक खेळाडू. इतर खेळाडूंच्या तुलनेत थोडी अधिक जोखीम घेऊन आपली कामगिरी कायम चांगली ठेवण्यावर या खेळाडूचा भर असतो. गेल्या तीन वर्षांत या खेळाडूची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली आहे. २०२२ वर्षाच्या अखेरीस या विभागातील काही उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव वार्षिक परतावा

एसबीआय कॉन्ट्रा फंड 37 %

एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंड 32 %

आयडीबीआय फ्लेक्सिकॅप फंड 21 %

बॅलन्स्ड फंड : इक्विटी फंडाच्या तुलनेने हा खेळाडू कमी आक्रमक आहे आणि थोडी कमी जोखीम घेऊन खेळण्याचा त्याचा लौकिक आहे. अर्थात वेळप्रसंगी योग्य संधी पाहून हा खेळाडू आक्रमक होतो. गेल्या तीन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणारे काही बॅलन्स्ड खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव वार्षिक परतावा

एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड 26 %

आयसीआयसीआय प्रु. इक्विटी/डेट फंड 26 %

टाटा हायब्रीड इक्विटी फंड 20 %

गोल्ड फंड : गेल्या तीन वर्षात या खेळाडूची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत याची कामगिरी आकर्षक वाटत नसली, तरी अटीतटीच्या वेळेला भरवशाचा खेळाडू म्हणून प्रत्येक चाणाक्ष गुंतवणूकदार याचा समावेश त्याच्या संघात करत असतो. गेल्या तीन वर्षातील या खेळाडूंच्या कामगिरीची काही प्रातिनिधिक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव वार्षिक परतावा

एसबीआय गोल्ड फंड 7 %

कोटक गोल्ड फंड 6 %

आदित्य बिर्ला सनलाईफ गोल्ड फंड 6 %

टॅक्स सेव्हिंग्ज फंड : उत्तम परतावा आणि करबचत असे दोन फायदे देणाऱ्या या खेळाडूचा समावेश प्राप्तिकराच्या कक्षेत येणाऱ्या गुंतवणूकदाराच्या संघात हमखासपणे केला जातो. आपल्या गुंतवणुकीच्या संघात एकदा या खेळाडूचा समावेश केला, की पुढील तीन वर्षे त्याला संघातून बाहेर काढता येत नाही हा वैशिष्ट्यपूर्ण नियम मात्र संघनिवडीच्या वेळी लक्षात ठेवावा लागतो. गेल्या तीन वर्षातील या खेळाडूंच्या कामगिरीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव वार्षिक परतावा

आयडीएफसी टॅक्स ॲडव्हांटेज फंड 29 %

कोटक टॅक्स सेव्हर फंड 23 %

पराग पारीख टॅक्स सेव्हर फंड 25 %

इंडेक्स फंड : सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन दिग्गज खेळाडूंना आदर्श मानून त्यांच्या पायवाटेने जाणाऱ्या या खेळाडूनेदेखील गेल्या तीन वर्षात दमदार कामगिरी केली आहे. इक्विटी फंडाचे सर्व अंगभूत गुण या खेळाडूच्या अंगी असतात आणि तुलनेने जोखीमसुद्धा कमी असते. त्यामुळे याचा समावेश आपल्या संघात अवश्य करावा असा सल्ला जाणकार देतात. या खेळाडूंच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव वार्षिक परतावा

युटीआय निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड 21 %

निप्पॉन इंडिया इंडेक्स फंड - सेन्सेक्स 20 %

आदित्य बिर्ला सनलाईफ गोल्ड फंड 21 %

म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ संघाच्या उत्तम कामगिरीमुळे या संघाला गुंतवणूकदारांचा पाठींबा वाढत आहे. भारतातील तब्बल सहा कोटी गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’चा समावेश त्यांच्या गुंतवणुकीच्या संघात केला आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात जवळजवळ दीड कोटी नवीन गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या संघात ‘एसआयपी’चा समावेश केला आहे. या संघाच्या कामगिरीवर खुश होऊन नक्कीच म्हणत असतील, वेल प्लेड एसआयपी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com