अमेरिकेच्या सत्तांतराचा सोन्याच्या दरावर परिणाम

राजेश कळंबटे
Tuesday, 10 November 2020

बागायतदार, सधन मच्छीमारांसह मध्यमवर्गीयांकडून रत्नागिरीत सोने खरेदी सुरू आहे. 

रत्नागिरी : अमेरिकच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढण्याची शक्‍यता आहे. अनेकांनी पन्नास टक्‍के पैसे देऊन ॲडव्हान्स दागिने खरेदी केले. दिवाळीच्या मुहूर्तावर ते दागिने मिळणार आहेत. बागायतदार, सधन मच्छीमारांसह मध्यमवर्गीयांकडून रत्नागिरीत सोने खरेदी सुरू आहे. 

सध्याही कोरोनाचा भर ओसरत चालल्याने शहरात सोने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. नवरात्रीपासून सुरू झालेल्या तेजीत जिल्ह्यात सुमारे ५० कोटींपर्यंत उलाढाल झाली 
असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी सोने ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवले आहे. १५ टक्के खरेदी ॲडव्हान्स बुकिंगची आहे, अशी माहिती सराफी पेढ्यांसधून मिळाली. सोन्याचे दर ५१ हजारवर होते. ते हळूहळू ४७ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले. सध्या ४९ हजार ५०० रुपये एक तोळ्याचा (१० ग्रॅम) दर आहे.

हेही वाचा - आता घड्याळाची टिकटिक होणार वेगाने -

खरेदीचा ओघ दिवाळीतही सुरू राहील असा अंदाज आहे. अमेरिकेतील निवडणुकीनंतर झालेल्या उलथापालथीचा सोने दरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, दरात चढ-उतार असले तरीही सोन्याला झळाळी आहे. दर घसरल्यामुळे अनेकांनी गेल्या पंधरा दिवसांत सोन्याची मोठ्याप्रमाणात खरेदी करून घेतली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० कोटींपर्यंत उलाढाल झाली असावी असा अंदाज आहे. 

खरेदीचा ट्रेंड बदलला असून ग्राहकांकडून कमी वजनाचे दागिने खरेदी केले जात आहे. जिथे दोन तोळे सोने खरेदी करणारा ग्राहक एक तोळ्याचा दागिना खरेदी करत आहे. यंदा विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने सोन्याचे दागिने बनविण्याकडे लोकांचा कल आहे. तसेच सोने विकून पैसे मिळू शकतात, हे कोरोना कालावधीत अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे उपलब्ध पैशातून सोने खरेदी केली जात आहे.

हेही वाचा -  दोन्ही काँग्रेसला सत्ताबदलाचे वेध ; भाजपमधून कोण करणार बंडखोरी ? -

"गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीकडील लोकांचा कल वाढला आहे. नवरात्रीनंतर बाजारातील उलाढाल वाढत असून दिवाळीतही तेजी राहील. दोन वर्षांतील मंदी कोरोनानंतर कमी झाली आहे."

- प्रमोद खेडेकर, जिल्हा हेड, इंडिया बुलिअन ॲण्ड ज्वेलरी असोसिएशन

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to the election america international market gold rate increase buyer advance booking was done