इबिक्स बनली सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी; केली यात्रा ऑनलाईनची खरेदी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

नवी दिल्ली: इबिक्स इन्कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित कंपनीने यात्रा ऑनलाईन इन्कॉर्पोरेशनचे संपादन केले आहे. इबिक्स ही कंपनी विमा, हेल्थकेअर, वित्तीय आणि ई-लर्निंग सेवा या क्षेत्रात ऑन डिमांड सॉफ्टवेअर आणि ई-कॉमर्स सेवा पुरवते. इबिक्सने यात्राचे संपादन 33.78 कोटी डॉलरला (2,323.6 कोटी रुपये) केले आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भातील करार झाला आहे. या करारानुसार यात्राचे इबिक्समध्ये विलीनीकरण होणार आहे. या संपादनामुळे नवी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी ट्रॅव्हल सर्व्हिसेस कंपनी बनणार आहे. मात्र विलीनीकरणानंतरसुद्धा यात्राचे काम स्वतंत्रपणे चालणार आहे.

नवी दिल्ली: इबिक्स इन्कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित कंपनीने यात्रा ऑनलाईन इन्कॉर्पोरेशनचे संपादन केले आहे. इबिक्स ही कंपनी विमा, हेल्थकेअर, वित्तीय आणि ई-लर्निंग सेवा या क्षेत्रात ऑन डिमांड सॉफ्टवेअर आणि ई-कॉमर्स सेवा पुरवते. इबिक्सने यात्राचे संपादन 33.78 कोटी डॉलरला (2,323.6 कोटी रुपये) केले आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भातील करार झाला आहे. या करारानुसार यात्राचे इबिक्समध्ये विलीनीकरण होणार आहे. या संपादनामुळे नवी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी ट्रॅव्हल सर्व्हिसेस कंपनी बनणार आहे. मात्र विलीनीकरणानंतरसुद्धा यात्राचे काम स्वतंत्रपणे चालणार आहे. भारतातील यात्राचा ब्रॅंडसुद्धा स्वतंत्रच राहणार आहे.

 'आम्हाला इबिक्सबरोबरच्या कराराची घोषणा करताना आनंद होतो आहे. यामुळे आमच्या समभागधारकांना वेगाने विस्तारणाऱ्या जगातील मल्टीनॅशनल ई-कॉमर्स कंपनीच्या व्यवसायात सामील होण्याची संधी मिळणार आहे', असे मत यात्रा ऑनलाईनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव श्रिंगी यांनी व्यक्त केले आहे. इबिक्स आणि यात्रा या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने सर्वसंमतीने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. 

या विलीनीकरणानंतर यात्राच्या प्रत्येक शेअरमागे समभागधारकांना इबिक्सचा विशेष प्राधान्याचा 0.005 शेअर मिळणार आहे. यात्रा आणि इबिक्स यांचे व्यवसाय आणि ब्रॅंड एकमेकांना पुरक असल्याचेही मत यावेळी श्रिंगी यांनी व्यक्त केले आहे. इबिक्सकॅश ही इबिक्सची भारतातील सहाय्यक कंपनी आहे. इबिक्सकॅशने याआधी मुंबईतील मर्क्युरी ट्रॅव्हल आणि दिल्लीस्थित लेझर कॉर्प या कंपन्यांचे संपादन केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ebix Inc Buys Yatra for Rs 2,324 crore