Economic recession : पुढील वर्षी आर्थिक मंदी

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ५८ टक्के सीईओंचे मत
Economic recession the following year finance KPMG 2022 India CEO Output Report
Economic recession the following year finance KPMG 2022 India CEO Output Reportsakal

मुंबई : पुढील वर्षभरात आर्थिक मंदी येण्याचा अंदाज देशातील ६६ टक्के सीईओंच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील ८६ टक्के मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ५८ टक्के अधिकाऱ्यांच्या मते मंदी आल्यास ती सौम्य राहील आणि अल्पावधीसाठी असेल. देशातील ५५ टक्के सीईओंनी मंदीचा सामना करण्यासाठी उपाययोजना केल्याचे केपीएमजी २०२२ इंडिया सीईओ आऊटपूट अहवालात म्हणण्यात आले आहे.

पुढील तीन वर्षांत व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि आव्हानांबाबत भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील सीईओंचे मत या अहवालात विचारात घेण्यात आले. सध्या भू राजकीय आणि आर्थिक आव्हाने असूनही जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेबाबत आत्मविश्‍वास वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये ५२ टक्के असणारे प्रमाण ऑगस्टमध्ये ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. जागतिक पातळीवरील ८१ टक्के सीईओंच्या तुलनेत भारतातील ७५ टक्के सीईओंनी भौगोलिक-राजकीय जोखमीचा विचार करून व्यवस्थापन प्रक्रिया समायोजित करण्याची योजना आखली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमधील लवचिकतेवर ८२ टक्के सीईओंचा विश्‍वास कायम आहे; मात्र दीर्घकालीन वाढीचा दृष्टिकोन परत येणे अद्याप बाकी आहे.

चिंतेची कारणे

कोविड- १९ महामारीमुळे आलेली मंदी, वाढत्या व्याजदराचा धोका, चलनवाढ, अपेक्षित मंदी आणि प्रतिष्ठेचा धोका यासह आर्थिक घटक हे सर्वांत गंभीर चिंतेचे कारण आहे. पुढील तीन वर्षांसाठी सध्याची भू-राजकीय अनिश्‍चितता आणि पुरवठा साखळीवर परिणाम करतील, असे भारतातील सीईओंना वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com