esakal | अर्थव्यवस्था 'आयसीयू' त
sakal

बोलून बातमी शोधा

Business

आयातीत मालाचा डोंगरच! 
भारताची चीनमधून होणारी आयात मोठी आहे. यामध्ये औषधांसाठीच्या मोलिक्‍युलपासून ते प्रत्येकाच्या कानाला दिसणाऱ्या मोबाईलपर्यंत अनेक वस्तू, उत्पादनांचा यात समावेश होतो. भारत चीनकडून ४५ टक्के इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे आयात करतो. भारत जगातून आणत असलेल्या मशिनरीपैकी एक तृतीयांश, दोन पंचमांश ऑरगॅनिक (कार्बनिक) रसायने एकट्या चीनमधून येतात. 

भारताच्या आयातीत ऑटोमोटिव्ह सुटे भाग व खतांमध्ये चीनचा वाटा २५ टक्के, मोबाईल फोनमध्ये सुमारे ९० टक्के एवढा प्रचंड आहे. 

अर्थव्यवस्था 'आयसीयू' त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनबरोबर जपान, दक्षिण कोरिया, युरोपीय महासंघ, इटली, इराण, यांच्यासह भारतालादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेअर बाजार, मॅन्युफॅक्‍चरिंगबरोबर अन्य उद्योग, जसे की, रसायने, ऑटोमोबाईल्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, आयटी, अवजड उत्पादने, शिपिंग, पर्यटन अशा अनेकविध उद्योग समस्यांना सामोरे जावे लागत 
आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आयसीयूत गेल्याचे चित्र आहे. विषाणूंच्या संसर्गाचा    सर्वाधिक फटका बसलेल्या व्यवसायांत प्रिसिजन इक्विपमेंट, मशिनरी, ऑटोमोटिव्ह आणि दळणवळण उपकरणे यांचा समावेश आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रभावित क्षेत्रे - शिपिंग, फॉर्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल्स, मोबाईल्स, वस्त्रोद्योग. 
वस्त्रोद्योग - यार्न आणि इतर कच्च्या मालाच्या भारतातून होणाऱ्या निर्यातीवर परिणाम. उत्पादकांना फटका.
शिपिंग - मालवाहू जहाजांची वाहतूक विस्कळित. ड्राय बल्क ट्रेडमध्ये ८० टक्के घट. 
ऑटो क्षेत्र - या क्षेत्रातील उत्पादनात ८-१० टक्के घट  शक्य, रोजगारावर परिणाम.
औषध उद्योग - औषधांचे उत्पादन घटून तुटवडाही निर्माण होऊ शकतो.
रसायन उद्योग - कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळित होणार.