अर्थव्यवस्थेसाठी ‘आरबीआय’चे निर्णय सकारात्मक - कोटक 

पीटीआय
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले, ‘‘आगामी काळात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आपण्यास पाहायला मिळतील.

नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले, ‘‘आगामी काळात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आपण्यास पाहायला मिळतील. त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल.’’ दरम्यान, आरबीआय संचालक मंडळाच्या बैठकीत लघू व मध्यम उद्योगांना पतपुरवठा करणाऱ्या योजनांची पुनर्रचना करण्याबरोबर त्याचे प्रमाण २५ कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, निर्बंधातील बॅंकांच्या अडचणींवर तोडगा काढणे, असे आदी निर्णय घेण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy RBI Decission Positive Uday Kotak