मला अध्यक्षपदावरून हटविल्यास अर्थव्यवस्था कोसळेल - ट्रम्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन - मला अध्यक्षपदावरून हटविल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत दिला आहे. ॲटर्नी जनरल जेफ सेशन्स आणि न्याय विभागावरही त्यांनी टीका केली आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘‘मला पदावरून हटविल्यास सर्व बाजारपेठा कोसळतील. प्रत्येक जण गरीब होईल, असे मला वाटते. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे पदावरून दूर करणार आहात, हे मला कळत नाही.

वॉशिंग्टन - मला अध्यक्षपदावरून हटविल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत दिला आहे. ॲटर्नी जनरल जेफ सेशन्स आणि न्याय विभागावरही त्यांनी टीका केली आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘‘मला पदावरून हटविल्यास सर्व बाजारपेठा कोसळतील. प्रत्येक जण गरीब होईल, असे मला वाटते. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे पदावरून दूर करणार आहात, हे मला कळत नाही. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत अर्थविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचा कबुलीजबाब मायकेल कोहेन यांनी दिला असून, हा गुन्हा ठरत नाही.’’  ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी ट्रम्प यांच्याबाबत कबुलीजबाब दिला आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या अर्थविषयक नियमांचे उल्लंघन करण्यास ट्रम्प यांनी सांगितले होते, असे कोहेन यांनी कबुलीजबाबात म्हटले आहे. यामुळे ट्रम्प यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: economy will collapse Donald Trump