Razorpay, Paytmसह 'या' पेमेंट गेटवेंना ईडीचा झटका! केली मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paytm

Razorpay, Paytmसह 'या' पेमेंट गेटवेंना ईडीचा झटका! केली मोठी कारवाई

नवी दिल्ली : Razorpay, Paytmसह Easebuzz आणि Cashfree पेमेंट गेटवेंना ईडीनं मोठा झटका दिला आहे. या पेमेंट गेटवेंचा मिळून एकूण ४६.६७ कोटी रुपयांचा निधी ईडीनं गोठवला आहे. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (ED freezes funds kept in payment gateways Easebuzz, Razorpay, Cashfree, Paytm)

चायनीज लोन अॅप केसमध्ये ईडीनं या कंपन्यांवर नुकत्याच धाडी टाकल्या होत्या, या धाडींमध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे. मनी लॉंडरिंग विरोधी कायद्यांतर्गत हा निधी गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी ईडीनं दिल्ली, मुंबई, गाझियाबद, लखनऊ आणि गया या शहरांमध्ये धाडी टाकल्या होत्या.

तसेच दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरु या ठिकाणच्या बँका आणि पेमेंट गेटवेच्या १६ ठिकाणी चौकशी केली होती. ऑनलाईन लोन देणाऱ्या चायनीज अॅपमध्ये या पेमेंट गेटवेनी आपल्या अकाऊंटमधील पैसा गुंतवला होता. HPZ नावाचे अॅप-आधारित टोकन आणि संबंधित घटकांच्या चौकशीसाठी या धाडी टाकण्यात आल्या होत्या, असं फेडरल एजन्सीनं एका निवेदनात म्हटलं आहे. नागालँडमधील कोहिमा पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने दाखल केलेल्या ऑक्टोबर 2021 च्या एफआयआरमधून हे मनी लाँड्रिंग प्रकरण तयार झालं आहे, असंही आपल्या निवेदनात ईडीनं म्हटलं आहे.

धाडींदरम्यान अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच पेमेंट एग्रीगेटरसह गुंतलेल्या संस्थांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक रक्कम ठेवल्याचं आढळलं आहे. जसं की, पुण्यातील Easebuzz प्रायव्हेट लिमिटेडकडे 33.36 कोटी रुपये, बंगळुरुमधील Razorpay Software Private Limited कडे 8.21 कोटी, बंगळुरुतील Cashfree Payments India Private Limited कडे 1.28 कोटी आणि नवी दिल्लीतील Paytm Payments Services Limited कडे 1.11 कोटी आढळले आहेत. या कंपन्यांच्या विविध बँक खाती आणि आभासी (व्हर्च्युअल) खात्यांमध्ये एकूण 46.67 कोटी रुपये आढळून आले जे गोठवण्यात आले आहेत, असं ईडीने स्पष्ट केलं आहे.

Web Title: Ed Freezes Funds Kept In Payment Gateways Easebuzz Razorpay Cashfree Paytm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..