esakal | मोठी बातमी  : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरी 'ईडी'चा छापा  
sakal

बोलून बातमी शोधा

ed raids yes bank founder rana kapoor residence worli Mumbai

प्रामुख्याने कॉर्पोरेट फायनान्सशी संबंधित कामकाज असलेल्या येस बॅंकेचा समभाग कपूर यांच्याच कार्यकाळात चारशे रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता.

मोठी बातमी  : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरी 'ईडी'चा छापा  

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे. अंमलबजवाणी संचालनालय अर्थात ईडीने ही कारवाई केली असून, कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. मुंबईतील वरळी परिसरात समुद्र महल या इमारतीत राणा कपूर यांचे निवासस्थान आहे. तेथे ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नीरव मोदीदेखील याच इमारतीत एकेकाळी राहत होता, अशी माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊऩलोड करा ई-सकाळचे ऍप 

'बॅंकेच्या संकटाबद्दल राणा कपूर यांना माहितीच नाही'  
मुंबई : देशभरात सगळीकडे येस बॅंकेच्या आर्थिक संकटाची चर्चा सुरू असतानाच बॅंकेचे संस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी बॅंकेत चालू असलेल्या कोणत्याही घडामोडीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. बॅंकेतून व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार झाल्यापासून मागील 13 महिन्यांत बॅंकेतील दैनंदिन कामकाजाविषयी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  बॅंकेची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते 3.4 लाख कोटींचे भागभांडवल असलेली बॅंक बनविण्यात राणा कपूर यांचा सिंहाचा वाटा होता.

येस बंकेच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येस बँक म्हणजे राणा कपूर
प्रामुख्याने कॉर्पोरेट फायनान्सशी संबंधित कामकाज असलेल्या येस बॅंकेचा समभाग कपूर यांच्याच कार्यकाळात चारशे रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. एकेकाळी येस बॅंक म्हणजेच राणा कपूर असे घट्ट समीकरण बनलेले असताना त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिल्यानंतर राणा कपूर यांनी बॅंकेशी संबंध तोडले होते. बॅंकेपासून अलिप्त होताना त्यांनी बॅंकेतील भागीदारी संपविण्यासाठी समभाग विक्रीला प्राधान्य दिले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 2.75 टक्के आणि नोव्हेंबर महिन्यात राहिलेला 1.8 आणि 0.8 हिस्सा विक्री करून सर्व समभाग विकले होते.