
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली होती.
गृहिणींसाठी गुड न्युज; महागाईपासून सामान्यांना दिलासा, खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण
सध्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. एकीकडे दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीत भरमसाठी वाढ होत असताना खाद्यतेलाच्या दरात मात्र या महिन्याभरात मोठी घट झालेली दिसून येत आहे. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली असल्याने सामान्य ग्राहकाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्यप्प्प्याने वाढ होत गेली. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आवक कमी झाली. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियात पामतेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील स्थानिक बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला. दरम्यान, किरकोळ बाजारात एक किलो तेलाच्या पिशवीमागे २० ते ३० रुपयांनी घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: MH Politics : राऊतांनंतर आता पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा, निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
दक्षिण अमेरिकेतील देशांतील हवामान बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाल्याने भारतात सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. जागतिक बाजारपेठेतील या घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. तेलाची आवक करणाऱ्या काही देशांनी पामतेल निर्यातीवर निर्बंध घातली असून त्याचाच परिणाम म्हणून भारतात तेलाचे दर वाढले आहेत.
जागतिक बाजारपेठेतून गेल्या महिन्याभरापासून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन, पामतेलाच्या दरात घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात दररोज १०० टन तेलाची आवक सध्या होत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर खाद्यतेलाचे दर अवलंबून असतात. खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
हेही वाचा: Commonwealth 2022: आईने शिवण काम करत घर चालवलं, लेक बनलाय भारताचा गोल्डन बॉय
Web Title: Edible Oil Rate Decreased Prices Fall Upto Rupees 200 To 300 For Per 15 Kg Box
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..