MH Politics : राऊतांनंतर आता पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा, निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये
political news of nilesh rane
political news of nilesh rane
Summary

मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 1000 कोटी पेक्षा जास्तीचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

याप्रकरणात आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतील आहे. त्यांनी एक ट्वीट करत खासदार राऊतांना टोला लगावला आहे. काल राऊत घरातून बाहेर पडतानाचा त्यांच्या त्यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलं आणि राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यावरुन भाजपचे निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

political news of nilesh rane
Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

निलेश राणे ट्वीट करत म्हणाले की, दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. यावेळी राऊत कुटुंबीय अत्यंत भावूक झालें होतं. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलं. राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राऊतांनी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही तिथे उपस्थित होत्या. राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यावर संजय राऊत यांच्या आईचे अश्रू अनावर झाले होते.

political news of nilesh rane
मागच्या वेळी फक्त मारहाण केली होती, यावेळी जीवे मारू; शिवसेना नेत्याला फोनवरून धमकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com