Stocks to Buy
Stocks to BuySakal

'या' मल्टीबॅगर एनर्जी स्टॉकने एका वर्षात दिला तब्बल एवढा परतावा!

गेल्या एका वर्षात एकी एनर्जी (EKI Energy) शेअरची किंमत 5150 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. एकी एनर्जी (EKI Energy) सर्व्हिसेसच्या संचालक मंडळाने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यू्च्या प्रति इक्विटी शेअरवर 20 रुपये (म्हणजे 200%) अंतरिम डिव्हिडेंट देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळांच्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली आहे. अंतरिम डिव्हिडेंट भरण्याची रेकॉर्ड तारीख 8 एप्रिल 2022 निश्चित करण्यात आली आहे.

Stocks to Buy
Bank Holidays: उद्यापासून सलग ५ दिवस बँका बंद!

बीएसई एसएमई स्टॉक त्याच्या लिस्टींगच्या तारखेपासून शेअरधारकांना चांगला परतावा देत आहे. कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये आला होता. तेव्हा या शेअरचा प्राईस बँड 100 ते 102 रुपये निश्चित केला होती. या IPO ने सुमारे 40 टक्के प्रीमियमने चांगली सुरुवात केली आणि 7 एप्रिल 2021 ला लिस्ट झाल्यापासून ते आतापर्यंत शेअरधारकांना चांगला परतावा देत आहेत. गेल्या एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 147 रुपयांवरुन वाढून 7751.55 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या संपुर्ण काळात या शेअरमध्ये 5150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. लिस्ट झाल्यापासून, या मल्टीबॅगर स्टॉकने त्याच्या भागधारकांना सुमारे 4700 टक्के परतावा दिला आहे.

Stocks to Buy
आज रात्रीपासून National Highwaysवर प्रवास महागणार,10 ते 15 टक्के वाढला Toll Tax

IPO मधून 2 वर्षांच्या कालावधीत 7500% परतावा


EKI Energy च्या IPO नंतर या शेअरमध्ये कोणत्याही गुंतवणुकदाराने आपले पैसे होल्ड केले असते तर त्यांना सुमारे 7500 टक्के (102 रुपये ते 7751.55 रुपये प्रति शेअर) परतावा मिळाला असता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com