esakal | इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी जिओबीपी व ब्ल्यूस्मार्टचे सहकार्य
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Vehicle

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी जिओबीपी व ब्ल्यूस्मार्टचे सहकार्य

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या (Electric vehicle charging) सोयीसुविधा (Facilities) उभारण्यासाठी जिओबीपी व ब्ल्यूस्मार्ट (blue smart) यांनी आंतराराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या (international environment Day) निमित्ताने सहकार्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांच्यातील करारानुसार (Agreement) साऱ्या देशभर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी केंद्रे उभारली जातील. दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) विभागात ब्ल्यूस्मार्ट ने प्रदूषणविरहित प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा आणला आहे. आता इतर शहरातही अशीच वाहने रस्त्यावर आणण्याचा त्यांचा इरादा आहे.

हेही वाचा: लैगिंक अत्याचारानंतर ३२ वर्षांच्या महिलेला अमानुष मारहाण

ब्ल्यूस्मार्ट ची वाहने असतील त्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंसाठी सोयीसुविधा उभारण्यासाठी या दोनही कंपन्या सहकार्य करतील. सुरुवातीला ही चार्जिंग केंद्रे शहरी भागात उभारली जातील व एकाचवेळी तीस गाड्या चार्ज करण्याची व्यवस्था त्यात असेल. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगच्या सोयी उभारण्यास जिओबीपी आघाडीवर असेल. यासाठी परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाईल, असे जिओबीपी चे सीईओ हरीष मेहता म्हणाले.

जिओबीपी ही रिलायन्स इंडस्ट्रीज व बीपी यांची संयुक्त कंपनी आहे. या सहकार्यामुळे भारतात दर्जेदार आणि विश्वासार्ह चार्जिंगच्या सुविधा मिळतील, असे ब्ल्यूस्मार्ट चे सीईओ अनमोल जग्गी म्हणाले. दिल्ली एनसीआर विभागात सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या ब्ल्यू स्मार्टने आतापर्यंत सुमारे पावणेदोन कोटी किलोमीटर अंतराच्या साडेपाच लाख फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. सुमारे अडीच लाखांहूनही जास्त प्रवाशांकडे हे अॅप आहे.

loading image
go to top