'EPFO'ची जबरदस्त स्कीम! 3 महिन्यांच्या पगाराइतके काढू शकता पैसे

1 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता आगाऊ पैसे, विनाशर्त मिळतील पैसे
EPFO
EPFO esakal
Updated on

EPFO Circular : कोरोनाव्हायरस महामारीमुळे कर्मचारी भविष्य निधी संगठनने (EPFO) पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना आगाऊ योजनेचा (Advanced Scheme) फायदा दिला आहे. EPFO ग्राहक आपल्या प्रोव्हिडेंट फंड अकाउंटमधून 3 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकतात. हे पैसे तुम्हाला परतही द्यायची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी EPF स्कीम-1952 मध्ये बदल केले आहेत. कर्मचारी जमा रकमेच्या 75% किंवा तीन महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकतात.

Summary

EPF मेंबर्स कोणत्याही मेडिकल एमर्जंसीसाठी 1 लाख रुपये आगाऊ काढू शकतात. यासाठी कोणतीही हमी देण्याची गरजही नाही.

1 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता आगाऊ पैसे (Adcance Money)

EPF मेंबर्स कोणत्याही मेडिकल एमर्जंसीसाठी 1 लाख रुपये आगाऊ काढू शकतात. यासाठी कोणतीही हमी देण्याची गरजही नाही. EPFO कडून जारी केलेल्या परिपत्रकात, कोविड-19 च्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचा मेडिकल अॅडव्हान्स दिला जाईल.

72 तासांच्या आत प्रक्रिया (Process)

संपूर्ण केवायसी खात्यांच्या अर्जावर 72 तासांच्या आत प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले. मागच्या वर्षीही कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला होता. EPFO ने कोविड-19 मध्ये 76.31 लाख अॅडव्हांस क्लेमसाठी एकूण 18,698.15 कोटी रुपयांचा रक्कम जारी केली होती.

EPFO
अर्थविश्व : बेरोजगारीचा दर 45 वर्षांतील उच्चांकी

ऑनलाइन काढू शकता PF मधून पैसे

  • PF काढण्यासाठी सगळ्यात आधी EPFO च्या ऑफिशिअल वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर लॉगइन करावे लागेल.

  • वेबसाइट सुरु झाल्यावर उजव्या बाजूला यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागेल, मग साइन इनवर क्लिक करा.

  • पेजच्या उजव्या बाजूला कर्मचारी प्रोफाइल दिसेल, आता 'मॅनेज' टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेन्यूमधून केवायसी सिलेक्ट करा.

  • पुढच्या पेजवर Services ऑनलाइन सेवा या टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन सूचीमधून Form (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) निवडा.

  • इथे तुम्ही मेंबरची माहिती पाहू शकता. आता व्हेरिफाय करण्यासाठी ‘होय’ वर तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाका.

  • पुढील पेजवर फॉर्म नंबर 31 निवडा. इथे तुम्हाला ‘I want to apply for’ लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘Proceed for online claim’ वर क्लिक करा.

क्लेमसाठी काही नियम

  • UAN अॅक्टिव्हेट असावे

  • तुमचा व्हेरिफाइड आधार UAN सोबत लिंक असावा.

  • IFSC कोडसोबत बँक खाते UAN शी लिंक असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com