'ईपीएफओ'चा पेन्शनधारकांना मोठा दिलासा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

मुंबई : भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना 'एम्प्लॉयिज पेन्शन स्कीम'अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनचा काही हिस्सा आधीच घेता येणार आहे. या निर्णयाचा लाभ देशातील 6.3 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना या सुविधेमुळे दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनमधील एक तृतीयांश हिस्सा एकरकमी पद्धतीने आधीच घेता येणार आहे. त्यानंतर 15 वर्षांपर्यत त्यांच्या पेन्शनमधून एक तृतीयांश रक्कम कापली जाणार आहे. 15 वर्षांनंतर त्यांनी पूर्ण पेन्शन मिळणार आहे. या निर्णयामुळे ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी पैशांची गरज असेल त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जे कर्मचारी 2009च्या  आधी निवृत्त झाले होते. 2009 मध्ये ईपीएफओने ही सुविधा काढून टाकली होती.

कर्मचाऱ्यांकडून या सुविधेची मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (सीबीटी) हैदराबाद येथे 21 ऑगस्ट 2019ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPFO gives benefits to pensioners