esakal | Investment : गुंतवणुकीसाठी अत्यंत दमदार स्कीम, 20 वर्षात 42 पट परतावा...
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual-Fund

कमी जोखीम आणि जास्त परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. तुमचे पैसे एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंड वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.

गुंतवणुकीसाठी अत्यंत दमदार स्कीम, 20 वर्षात 42 पट परतावा...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

Mutual Fund Return Machine Scheme: इक्विटी म्युच्युअल फंड हा भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे जो कमी जोखमीसह जास्त परतावा मिळवून देतो. इक्विटीमध्ये थेट पैसे गुंतवूनही धोका खूपच कमी असतो. याचे कारण असे आहे की तुमचे पैसे एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंड वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणते. बाजारात अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न मशीन म्हणून सिद्ध झाल्या आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ काळासाठी यामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांना अनेक पटीने जास्त परतावा मिळाला आहे. यापैकी एक आहे कोटक ब्लूचिप फंड (Kotak Bluechip Fund),गुंतवणूकदारांसाठी कोटक म्युच्युअल फंड कंपाऊंडिंगची लार्ज कॅप योजना आहे. या योजनेने 20 वर्षात 21 टक्के CAGR परतावा दिला आहे

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठीचे कमाल स्टॉक्स, टारगेट आणि स्टॉप लॉस किती ठेवावा?

10 वर्षाचा परतावा (Return): 15 टक्के सीएजीआर (CAGR)

कोटक ब्लूचिप फंडने 10 वर्षात 15 टक्के सीएजीआर दराने परतावा दिला आहे. जर कोणी 10 वर्षांसाठी या फंडात 50 हजार रुपये गुंतवले असते, तर त्याचे आता 2 लाख रुपये झाले आहेत. दुसरीकडे, जर कोणी 10 वर्षांसाठी मासिक 5000 रुपयांची नियमित एसआयपी केली असेल, तर आता याची किंमत 14 लाखांच्या जवळपास गेली आहे.

20 वर्षाचा परतावा (Return): 21टक्के सीएजीआर (CAGR)

कोटक ब्लूचिप फंडने 20 वर्षात 21 टक्के सीएजीआर दराने परतावा दिला आहे. जर कोणी या फंडात फक्त 50 हजार रुपये ठेवले असतील आणि 20 वर्ष वाट पाहिली असेल तर त्याचे पैसे वाढून 21 लाख रुपये झाले असतील. दुसरीकडे, जर कोणी 20 वर्ष मासिक 5000 रुपयांची नियमित एसआयपी केली असेल, तर आता त्याच्या गुंतवणूकीची किंमत 90 लाख रुपये झाली असेल.

तुम्हाला कोटक ब्लूचिप फंडात (Kotak Bluechip Fund) एक रकमी गुंतवणूक करायची असेल तर किमान 1000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तुम्ही जास्तीत जास्त पैसे गुंतवू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला एसआयपी करायची असेल तर तुम्हाला दरमहा किमान 5000 रुपये गुंतवावे लागतील. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या फंडाची एकूण मालमत्ता 3233 कोटी रुपये होती. तर खर्चाचे प्रमाण 2.08 टक्के आहे. त्याचा धोका सरासरीपेक्षा कमी आहे.

हेही वाचा: आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या...

तुम्ही कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहात?

कोटक ब्लूचिप फंड (Kotak Bluechip Fund) प्रामुख्याने लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी, एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि भारती एअरटेल या प्रमुख शेअर्सचा समावेश आहे.

सर्वोत्तम आणि सर्वात वाईट कामगिरी

या फंडाची सर्वोत्तम कामगिरी 23 एप्रिल 2003 ते 22 एप्रिल 2004 पर्यंत होती आणि या कालावधीत फंडाने 141 टक्के परतावा दिला. 15 जानेवारी 2008 ते 13 जानेवारी 2009 दरम्यान फंडाची कामगिरी सर्वात वाईट होती आणि 54 टक्क्यांनी घटली.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top