आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loan

आधार कार्ड तुम्हाला पर्सनल लोनही मिळवून देऊ शकते.

आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या...

- शिल्पा गुजर

आधार कार्ड (Aadhaar Card):आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींसाठी आधार कार्ड गरजेचे आहे आणि आता हेच आधार कार्ड तुम्हाला पर्सनल लोनही मिळवून देऊ शकते.

हेही वाचा: Amazon कडून नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल 1,10,000 लोकांना देणार जॉब

आधार अपडेट (Aadhaar Update): मोदी सरकारची आधार योजना सामान्य लोकांसाठी मोठा दिलासा आहे. सध्या आधार कार्डशी संबंधित बरीच कामे केली जात आहेत. आधार कार्डसोबत पॅन जोडणे, मोबाइल नंबर, पीएफ खाते आणि बँक खाते जोडणे अनिवार्य झाले आहे. आधार यासाठीही आवश्यक आहे कारण त्यात त्या व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीचा संपूर्ण तपशील आहे. त्यामुळे आधारला अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जात आहे.

हेही वाचा: एफडीपेक्षा जास्त व्याज! जोखीमही नाही, मिळवा भरघोस परतावा

आधारमधून वैयक्तिक कर्ज (Personal Loan)घेण्यासाठी आवश्यक बाबी...

आधार कार्डमधून पर्सनल लोन घ्यायचे असेल, तर तुमच्या आधार कार्डमधील माहिती योग्य आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. जेव्हा माहिती योग्य असेल तेव्हाच तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता.

हेही वाचा: भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सचा यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये डंका

पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करावा?

- ज्या बँकेच्या वेबसाइटवर किंवा अॅपवरून कर्ज घ्यायचे आहे त्या वेबसाइटवर लॉगइन करा

- बँकेच्या वेबसाइटवर कर्जाच्या पर्यायावर (Loan Option)जा आणि वैयक्तिक कर्जावर (Personal Loan)क्लिक करा

- आता आपण वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहात की नाही हे इथे तपासा

- एकदा पात्रता निश्चित झाली की, अप्लाय टॅबवर क्लिक करा

- आता एक अॅप्लीकेशन विंडो उघडेल, ज्यात आपल्या वैयक्तिक, रोजगार आणि व्यवसायाचा तपशील द्यावा

- यानंतर, बँकर (Bank Employee) आपल्याबरोबर तपशील (Details) पडताळून बघेल

- त्यानंतर आपल्याला आधार कार्डची प्रत अपलोड करण्यास सांगितले जाईल

- बँकेने आपली माहिती पडताळताच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल

- या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय किमान 23 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असणे आवश्यक आहे

loading image
go to top