इथेनॉल दराचा फेरआढावा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

नवी दिल्ली - साखर उद्योगाला दिलासा देण्याच्या निर्णयांचा भाग म्हणून सरकारने इथेनॉलच्या दराचा फेरआढावा घेण्यास मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय आज झाला. 

सरकारने अलीकडेच साखर उद्योगाला सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. तत्पूर्वी उसाला प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान देण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला होता. यामध्ये इथेनॉलचे दर वाढविण्याचीही मागणी सुरू होती. त्या पार्श्‍वभूमीवर इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा उपयोग वाढविण्यासाठी सरकारी कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलचे दर वाढविण्याचा निर्णय समितीने घेतला. ‘सी’ श्रेणीच्या मळीपासून बनविलेल्या इथेनॉलच्या दरात ४०.८५ रुपये प्रतिलिटरवरून ४३.७० रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली; तर ‘बी’ श्रेणीच्या इथेनॉलचे दर ४७.४९ रुपये प्रतिलिटर निश्‍चित करण्यात आले. दोन्ही प्रकारच्या इथेनॉलच्या दरात जीएसटी आणि वाहतूक खर्च अतिरिक्त असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ethanol rate government