शेअर बाजाराच्या घसरणीतही या शेअरची भरारी, 1 महिन्यात 250% का रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

शेअर बाजाराच्या घसरणीतही या शेअरची भरारी, 1 महिन्यात 250% का रिटर्न

मुंबई : शेअर बाजारात सध्या कमजोरीचे वातावरण आहे. पण अशाही स्थितीत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. असाच एक स्टॉक सोनल मर्कंटाइल लिमिटेडचा (Sonal Mercantile Ltd) आहे, ज्याने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत साडेतीन पटीने वाढ केली आहे आणि त्यांना गेल्या साडेसात वर्षांत 2,700 टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला आहे.

सोनल मर्कंटाइलच्या शेअर्स सध्या 162.10 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. कंपनीचे शेअर्स गेल्या 17 ट्रेडिंग दिवसांपासून सतत अप्पर सर्किटमध्ये आहेत, त्यामुळेच गेल्या एका महिन्यात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 251 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे.

सोनल मर्कंटाइलचे शेअर्स 2022 च्या सुरुवातीपासून सुमारे 277 टक्क्यांनी वाढलेत, तर गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 455.14 टक्के परतावा दिला आहे. सोनल मर्कंटाइल शेअर्सने पहिल्यांदा 9 फेब्रुवारी 2015 ला व्यापार सुरू केला आणि त्यावेळी त्याची किंमत फक्त 5.75 रुपये होती, जी आता 162.10 रुपये झाली आहे.

अशाप्रकारे, गेल्या साडेसात वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 2,719.13 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

एका महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने सोनल मर्कंटाइलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक 250 टक्क्यांनी वाढून 3.5 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 5.55 लाख रुपये झाले असते.

दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 9 फेब्रुवारी 2015 रोजी सोनल मर्कंटाइलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 2,719.13 टक्क्यांनी वाढून 28.19 लाख रुपये झाले असते.

पण दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत सोनल मर्कंटाइलचा निव्वळ नफा याच तिमाहीत 6.08 कोटी रुपयांच्या तुलनेत 44.04 लाख रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, कंपनीचे एकूण उत्पन्न जूनच्या तिमाहीत 19.53 कोटी रुपयांवर घसरले, जे मागील तिमाहीत 27.50 कोटी रुपये होते.

कंपनी काय करते ?

सोनल मर्कंटाइल ही फायनांशियल सर्व्हिसेज कंपनी असून ती 1985 पासून या व्यवसायात आहे. कंपनीचा फोकस इंटर कॉर्पोरेट लोन, कॉर्पोरेट लोन, पर्सनल लोन, लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म लोन, ट्रेड फायनांसिंग, बिल्स डिस्काउंटिंग, प्रोजेक्ट अप्रेझल, लोन अगेंट्स गॅरंटी इत्यादींवर आहे. शिवाय सिक्युरिटीज, शेअर्सचे ट्रेडींग आणि स्टॉक व कमोडिटी मार्केटच्या आर्बिट्रेज व्यवसायातही आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market