esakal | शेअर बाजारातून बाहेर पडण्यासाठी वेदांता लिमिटेडची तयारी सुरु  
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारातून बाहेर पडण्यासाठी वेदांता लिमिटेडची तयारी सुरु  

भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर नोंदणीकृत असलेल्या वेदांता लिमिटेडचे 51.06 टक्के म्हणजेच 176 कोटी 43 लाख 26 हजार 80 शेअर अगरवाल यांच्या वेदांता रिसोर्स लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या मालकीचे आहेत.

शेअर बाजारातून बाहेर पडण्यासाठी वेदांता लिमिटेडची तयारी सुरु  

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर भांडवल उभारणी सोपी व्हावी आणि धोरण सुलभतेच्या माध्यमातून आर्थिक लवचिकता मिळून व्यवसाय वाढीमध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी वेदांता लिमिटेडला भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडण्यासाठी  'डीलीस्ट' करण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी असलेले 49 टक्के मालकीचे शेअर खरेदी करण्याची योजना कंपनीचे प्रमुख अनिल अगरवाल यांनी तयार केली आहे. हे शेअर खरेदी करण्यासाठी अगरवाल 16 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर नोंदणीकृत असलेल्या वेदांता लिमिटेडचे 51.06 टक्के म्हणजेच 176 कोटी 43 लाख 26 हजार 80 शेअर अगरवाल यांच्या वेदांता रिसोर्स लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या मालकीचे आहेत. तर 169 कोटी 10 लाख 90 हजार 351 शेअर म्हणजे 48.94 टक्के शेअर किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहेत. त्यामुळे हे शेअर खरेदी करून कंपनीला 'पब्लिक लिमिटेड' ऐवजी 'प्रायव्हेट' करण्याचा अगरवाल यांचा मानस आहे. यासाठी कंपनीने सोमवारी शेअर बाजाराचे कामकाज संपले होते तेंव्हा व्यवहार करत असलेल्या शेअरच्या किंमतीत 9.9 टक्के वाढ करून शेअर धारकांना प्रति शेअर 87.5 रुपये देण्याची तयारी ठेवली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाचे म्हणजे, भारतीय शेअर बाजारातून 'डीलीस्ट' होण्यात यश मिळाल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवरून देखील 'डीलीस्ट' होण्याचा कंपनीचा विचार आहे. या अगोदर देखील समूहाने 2016 मध्ये वेदांत रिसोर्सेस पाईचे ( वेदांत रिसोर्स लिमिटेड) डीलीस्टिंग केले होते. .