या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, येत्या काळात मिळेल चांगला नफा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Todays Share Market News

या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, येत्या काळात मिळेल चांगला नफा...

शेअर बाजारात कधी तेजी तर कधी घसरण ही नित्याची बाब झाली आहे. या अस्थिरतेच्या काळात तुम्ही कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत असतात. अशात शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे आणि यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

शारदा मोटरमध्ये (Sharda Motor) पैसे गुंतवावे असे मत जैन यांनी व्यक्त केले आहे. कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून मजबूत तिमाही निकाल सादर केल्याचे जैन म्हणाले.

शारदा मोटर (Sharda Motor)

सीएमपी (CMP) - 891.95 रुपये

टारगेट (Target) - 990/1030 रुपये

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला

कंपनी काय करते ?

शारदा मोटर (Sharda Motor) ही कंपनी ऑटो मोबिल क्षेत्रासाठी एक्झॉस्ट सिस्टम बनवते. ही कंपनी एक्झॉस्ट सिस्टीमची देशातील सर्वात मोठी उत्पादक आहे. तज्ञांच्या दृष्टीने कंपनीचे फंडामेंटल चांगले आहेत, त्यामुळे या शेअर्समध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावता येईल असा सल्ला त्यांनी दिला.

कंपनीचे फंडामेंटल ?

शारदा मोटर (Sharda Motor) ही कंपनी 15 च्या PE मल्टिपलवर काम करते. याशिवाय, रिटर्न ऑन इक्विटी 28 टक्के आहे आणि ही एक शून्य कर्ज कंपनी आहे. गेल्या 3 वर्षातील विक्रीचा CAGR 25% आहे. याशिवाय कंपनी डिव्हिडेंडही देते. शिवाय 1 टक्का डिव्हिडेंड यील्डही देते.

हेही वाचा: Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट

जून 2021 मध्ये कंपनीला 36 कोटी रुपयांचा नफा झाला होता आणि जून 2022 मध्ये 60 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा 73% आहे. शारदा मोटर (Sharda Motor) 1986 पासून कार्यरत आहे. यात पैसे गुंतवल्यास येत्या काळात चांगला नफा मिळेल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Expert Advice To Invest Money In This Share You Will Get Good Profit In The Coming Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketNiftymoney