तुमची माहिती चोरल्याप्रकरणी फेसबुकला मोठा दंड

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

वॉशिंग्टन : सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला आता 5 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी झाल्याप्रकरणी आणि  युजर्सना माहिती चोरीला गेल्याची माहिती न कळवल्यामुळे एफटीसी अर्थात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडून 5 अब्ज डॉलरच्या दंडाची वसुली केली जाणार आहे. 5 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 

काय आहे नेमके प्रकरण? 
अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेशी संबंधित ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या ब्रिटिश कंपनीने 8 कोटी 70 लाख अमेरिकी फेसबुक युजर्सची खासगी माहिती मिळवल्याचे लक्षात आले. शिवाय ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ व लंडनच्या ‘द ऑब्झर्व्हर’ने याबाबत वृत्तांकन केल्यानंतर आयोगाने फेसबुकमधील 'डेटा' चोरीचं तपासास सुरुवात केली. 

अमेरिकी रिपब्लिक व डेमोक्रॅट सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाने 3 विरुद्ध 2 मतांनी या दंडावर शिक्कामोर्तब केले असून फेसबुकला आता दंड भरावा लागणार आहे. 

फेसबुकचे उत्पन्न आणि दंड 
सोशल मीडिया कंपनी असलेली फेसबुक अमेरिकी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. चालू आर्थिक वर्षात फेसबुकने 69 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे दंडाची रक्कम फेसबुकच्या मानाने कमी असली तरी अमेरिकेतील टेक कंपनीला लावण्यात ठोठावण्यात आलेला हा मोठा दंड आहे. याआधी गुगलवरही असा दंड लावण्यात आला होता. गुगलला 2012 मध्ये 2 कोटी 20 लाख डॉलर दंड भरावा लागला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook lost control of our data. Now it's paying a record $5 billion fine