कोरोना संकटात फेसबुकची चांदी; मार्क झुकरबर्ग 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये

zukerberg
zukerberg

वॉशिंग्टन- शेअर बाजारात फेसबुक शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत असल्याने कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या उद्योगपतींच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. झुकरबर्ग यांनी पहिल्यांदा या क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे. 

टिकटॉकसारखा प्रतिस्पर्धी हटण्याच्या शक्यतेने फेसबुक कंपनीच्या शेअर्संनी विक्रम उंची गाठली आहे. केवळ 36 वर्षाचे मार्क झुकरबर्ग आता दिग्गज अमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. 100 अरब डॉलर क्लबमध्ये  जगात केवळ तीन व्यक्ती आहेत. फेसबुकमध्ये झुकरबर्ग यांचा जवळजवळ 13 टक्क्यांचा हिस्सा आहे. 

अमेरिकेच्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांना आणि त्यांच्या संस्थापकांना कोरोना संकट आणि टाळेबंदी मोठा फायदा घेऊन आली आहे. कोरोना महामारीच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने तळाला जात आहे, पण यावर्षी मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 22 अब्ज डॉलरची, तर जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 75 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.

पाच दिग्गज टेक कंपन्यांमध्ये अॅपल, अमेझॉन, अल्फाबेट गूगल, फेसबुक आणि माईक्रोसॉफ्ट कॉर्प यांचा समावेश होतो. या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 30 टक्के आहे. या कंपन्यांचे बाजार भांडवल दोन वर्षात जवळजवळ दुप्पट झालं आहे. 

फोर्ब्सनुसार, रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती 80.3 अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी जगात श्रीमंतांच्या यादीमध्ये पाचवे आहेत. यावर्षी अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 22 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती अशाच पद्धतीने वाढत गेली तर तेही 100 अब्ज करोडच्या क्लबमध्ये लवकरत सामील होण्याची शक्यता आहे. 

यावर्षी टैंसेन्ट होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनी मा यांची संपत्ती 17 अब्ज डॉलरने वाढून 55 अब्ज डॉलर झाली आहे. याशिवाय पिनडुओडुओचे प्रमुख कोलिन हुआंग यांची संपत्ती 13 अब्ज डॉलरने वाढून 32 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com