फेसबुक करणार महिला कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट !

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

कॅलिफोर्निया: फेसबुकने पुढील पाच वर्षभरात जगभरातील आपल्या कार्यालयांमधून महिला कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील कार्यालयांमध्ये कृष्णवर्णीय नागरिकांची संख्या दुप्पट करण्याचेही फेसबुकचे उद्दिष्ट आहे.

आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वैविध्य आहे. यात सर्व पार्श्वभूमीचे, अनुभवांचे, रंगांचे, कर्मचारी आहेत, असे फेसबुकने म्हटले आहे. 2014 नंतर फेसबुकने कृष्णवर्णीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या 25 पटींनी वाढवली आहे तर कृष्णवर्णीय पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या 10 पटींनी वाढवली आहे. कॉर्पोरेट इक्वॅलिटी इंडेक्सच्या मानवाधिकार मोहिमेत 100 टक्के मिळवल्याबद्दल फेसबुकने समाधान व्यक्त केले आहे. कर्मचाऱ्यांच्या वैविध्याच्या अभावाबद्दल फेसबुक टीकासुद्धा झाली होती. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी फेसबुकने 42 लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook sets goal to double female workforce in five years