‘एफडीआय’चा ओघ वाढला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 January 2019

मुंबई - देशातील थेट परकी गुंतवणुकीत (एफडीआय) १८ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालातून स्पष्ट झाले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात थेट परकी गुंतवणूक ४ लाख ३३ हजार ३०० कोटींनी वाढली. ३१ मार्चअखेर एफडीआयचे बाजारमूल्य २८ लाख २४ हजार ६०० कोटी असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या कंपन्यांची परकी कर्जे आणि मालमत्ताविषयक केलेल्या सर्वेक्षण अहवालात दिले आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या या सर्वेक्षणात २३ हजार ६५ कंपन्यांनी मते नोंदवली. ज्यातील २० हजार ७३२ कंपन्यांनी भारतात थेट परकी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात भारतीत कंपन्यांच्या परदेशातील गुंतवणुकीत पाच टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. भारतीय कंपन्यांनी ५.२८ लाख कोटींची गुंतवणूक केली. व्यापारातील वृद्धीने परकी कंपन्यांची भारतातील गुंतवणूक वाढत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. ज्यात मॉरिशसने आघाडी घेतली आहे.

मॉरिशस कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यांचे प्रमाण एकूण गुंतवणुकीत १९.७ टक्के आहे. त्याखालोखाल अमेरिका आणि ब्रिटन आणि जपानमधील कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे. भारतीय कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी मात्र सिंगापूरकडे ओढा आहे. भारतीय कंपन्यांनी परदेशातील एकूण गुंतवणुकीपैकी सिंगापूरमधील गुंतवणूक प्रमाण १७.५ टक्के आहे.

कंपन्यांचे उत्पादन क्षेत्राला प्राधान्य 
भारतात गुंतवणूक करणाऱ्या परकी कंपन्यांना कारखाना उत्पादन क्षेत्राचे आकर्षण आहे. एकूण थेट परकी गुंतवणुकीत उत्पादन क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या पाहणीत आढळून आले. त्याखालोखाल माहिती, दूरसंचार सेवा, वित्त सेवा आदी क्षेत्रांत मोठी परकी गुंतवणूक झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDI Reserve Bank of India Investment