'फेड'चा जोर का झटका धीरेसे; शेअर बाजारात मोठी पडझड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य दिल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. 'फेड'ने बुधवारी व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारच्या सत्रात त्याचा परिणाम होऊ दिला नव्हता. मात्र, अमेरिकन आणि यूरोपीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरल्याने आज मात्र भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य देत आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला.

मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य दिल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. 'फेड'ने बुधवारी व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारच्या सत्रात त्याचा परिणाम होऊ दिला नव्हता. मात्र, अमेरिकन आणि यूरोपीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरल्याने आज मात्र भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य देत आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला. आज, 689 अंशांच्या घसरणीच्या सेन्सेक्स 35,742 वर स्थिरावला. तर, 197 अंशाच्या घटीने निफ्टी 10,754 वर बंद झाला. 

नाताळाच्या सुट्ट्यानां प्रारंभ होत असल्याने जागतिक गुंतवणूकदार वर्षाच्या अखेरीस नफा 'बुक' करण्याला प्राधान्य देत असल्याने देखील शेअर बाजार घसरतानाचे चित्र पहायला मिळते. मात्र, फेडने केलेली व्याजदरवाढ अनपेक्षित असल्याने हा परिणाम जास्त जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

आज प्रामुख्याने, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस या आयटी कंपन्यांबरोबरच अदानी पोर्ट्स, एअरटेल, एशियन पेंट्स सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. तर, एनटीपीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्सने सकारत्मक कामगिरी नोंदविली. 

आजच्या झालेल्या पडझडीत लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मालकॅप सहित बीएसई वरील सर्वच शेअर निर्देशांक नकारात्मक व्यवहार करून बंद झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FED dragged the market