‘जेट’च्या आर्थिक संकटावर तोडगा

वृत्तसंस्था
Friday, 15 February 2019

मुंबई -  ‘जेट एअरवेज’वरील आर्थिक संकटावर अखेर तोडगा निघाला आहे. कंपनीला जवळपास साडेआठ हजार कोटींची तातडीची गरज असून, त्यासाठी बॅंकांनी अर्थसाह्य करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वात दिलेला अर्थसाह्य कृती आराखडा जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने गुरुवारी (ता. १४) स्वीकारला आहे.

शेअर्स इश्‍यू करून भांडवली गुंतवणूक, कर्ज पुनर्रचना, विमानांची विक्री आणि भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बॅंकांचा जादा निधी जेट एअरवेजला संजीवनी देणारा ठरणार आहे.

कृती आराखड्यानुसार कंपनीत नव्याने भांडवली गुंतवणूक करण्याबरोबरच मालमत्तांची विक्री आणि कर्ज पुनर्रचना केली जाणार आहे. कंपनीवरील कर्ज शेअर्समध्ये परावर्तीत करण्यात येणार आहे. यानंतर अर्थसाह्य करणाऱ्या बॅंका जेट एअरवेजमध्ये सर्वांत मोठ्या भागधारक बनतील. जेट एअरवेजला साडेआठ हजार कोटींची गरज आहे. कंपनीवरील कर्ज दहा रुपये दर्शनी मूल्याच्या ११.४ कोटी शेअर्समध्ये परावर्तित केले जाणार आहे. जेट एअरवेजला या प्रस्तावावर येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारणसभेत मंजुरी घ्यावी लागेल. त्याशिवाय बॅंकांच्या प्रतिनिधीचा कंपनीच्या संचालक मंडळात समावेश  होणार आहे.

सलग चौथ्या तिमाहीत तोटा
जेट एअरवेजला सलग चौथ्या तिमाहीत तोटा झाला. ३१ डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला ५८७.८० कोटींचा तोटा झाला. विमान इंधनाच्या दरांतील वाढ आणि तीव्र स्पर्धेने तोटा सहन करावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. याच तिमाहीत कंपनीला ६ हजार १४७.९८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final settlement on the financial crisis of Jet Airways