esakal | देशाचा विकासदर 7.5 ते 8.5 राहण्याचा अर्थमंत्र्यांचा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

arthaviswa

देशाचा विकासदर 7.5 ते 8.5 राहण्याचा अर्थमंत्र्यांचा विश्वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमातील शिथिलता आणि कोरोनाचा घटता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आहेत. त्यात आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही देशाचा जीडीपी वेगाने दुहेरी आकड्याच्या नजीक जात असल्याचा विश्वास आज व्यक्त केला.

त्या हार्वर्ड कॅनेडी स्कूलच्या संवादात बोलत होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सध्याच्या आर्थिक वर्षादरम्यान जीडीपीची वाढ दुहेरी आकड्याच्या दिशेने जात आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशाचा आर्थिक विकासदर ७.५ टक्के, तर ८.५ टक्क्यांदरम्यान राहील. जो पुढील वर्षीही हे सातत्य टिकवेल. संवादात त्या पुढे म्हणाल्या की, या वर्षी आम्ही भारताचा आर्थिक विकासदर दुहेरी आकड्यांच्या नजीक पाहत आहोत. हा विकासदर जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत जास्त असल. तर या वर्षांच्या आधारावर पुढील आर्थिक वर्षात जीडीपी ८ टक्क्यांच्या जवळपास राहील. त्या म्हणाल्या, आतापर्यंत अर्थमंत्रालयाने आर्थिक वृद्धीच्या आकडेवारीसाठी कोणतेही मूल्यांकन केलेले नाही.

हेही वाचा: ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

मात्र, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अन्य मूल्यांकन करणाऱ्या संस्थांच्या मूल्यांकनानुसार आर्थिक वर्ष २०२२ मध्ये दुहेरी आकड्याने वृद्धी दर्शवेल. देशातील उद्योगांच्या विस्ताराचा दर पाहता आर्थिक विकास दर पुढील वर्षापर्यंत ७.५ टक्के ते ८.५ टक्क्यांदरम्यान राहील. तो कमी होण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत सध्या नाहीत, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

loading image
go to top