अमिताभ बच्चन, शाहरूख खान शिकवतायत ग्लॅमरस पैशाच्या गोष्टी

Financial lessons from celebrity millionaires who lost a fortune
Financial lessons from celebrity millionaires who lost a fortune

शिक्षणाची प्रक्रिया अविरत सुरु असते. विशेषत: आर्थिक बाबींसंदर्भातील ज्ञान अनुभवातूनच अधिक मिळते. आपण 'सेलिब्रेटीं'च्या  झगमगत्या आणि खर्चिक जीवनशैलीबद्दल कायमच ऐकत असतो. मात्र कोट्यवधींची संपत्ती जमवून देखील एखादी व्यक्ती ते सर्व पैसे गमाऊ शकते. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवू शकते यावर आपला विश्वास बसत नाही. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान आणि ख्यातनाम टेनिसपटू बोरिस बेकर यांच्या आयुष्यातून आपल्याला आर्थिक बाबतीत काय शिकता येण्यासारखे आहे ते पाहूया.

बिझनेस आणि उद्योग क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे► क्लिक करा

बिग बी अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन, भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक. बॉलीवूडच्या सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक. मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का ? की वयाच्या 57 वर्षी त्यांची कंपनी दिवाळखोर झाली होती. त्यांच्याकडे कोणतीही बचत नव्हती आणि डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते. अर्थात नंतर अमिताभ बच्चन यांनी अभिनेता म्हणून स्वत:च पुन्हा एकदा भरारी घेतली. त्यातून पुन्हा एकदा ते यशाच्या शिखरावर पोचले. त्यांनी खूप पैसा कमावला, अगदी पहिल्या इनिंगपेक्षाही अधिक. 2019 सरले तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचे एकूण मूल्य 40 कोटी डॉलर इतके आहे.

बिझनेस आणि उद्योग क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे► क्लिक करा

आपण घ्यावयाचे धडे : आपण काय शिकणार? 
1. अभ्यासाशिवाय आणि योग्य नियोजनाअभावी पैसा गुंतवणे किंवा अशा व्यवसायात पैसा गुंतवणे तुमच्या संपत्तीच्या नाशास कारणीभूत ठरू शकते.
2. भरपूर पैसा कमावल्यावर मिळणारा पैसा योग्य ठिकाणी गुंतविला पाहिजे
3. बिग बींच्या  आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे जोखीम विश्लेषणाचे महत्त्व.

किंग खान अर्थात शाहरुख खान
शाहरुख खान यांच्या एकूण संपत्तीचे अंदाजे मूल्य 60 कोटी डॉलर इतके आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी अनेक क्षेत्रात गती साधली. अगदी स्वत:ची 'एंटरटेनमेंट' कंपनी सुरू करण्यापासून ते 'आयपीएल'च्या संघाची मालकी मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी शाहरुख खान यांनी केल्या. त्यामुळे चित्रपटात अभिनय करून मिळणाऱ्या उत्पन्नावरील शाहरुख खान यांचे अवलंबित्व संपले.

बिझनेस आणि उद्योग क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे► क्लिक करा

आपण घ्यायचे धडे :
1. उत्पन्नासाठी एकाच साधनावर अवलंबून न राहता अनेक साधने निर्माण करा.
2. उत्पन्नाचे योग्य नियोजन करा. आर्थिक शिस्त लावा.
3. जोखीम लक्षात घेऊन केलेली सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि 'अॅसेट अॅलोकेशन' संपत्ती निर्मितीची गुरूकिल्ली आहे.

बोरिस बेकर : महान टेनिसपटू
बोरिस बेकरने यशस्वी कारकिर्दीच्या जोरावर प्रचंड संपत्ती कमावली होती. त्याच्या एकूण संपत्तीचे मूल्य 16.7 कोटी डॉलर इतके होते. परंतु आर्थिक नियोजनाअभावी 2017 मध्ये बोरिसला स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्याची वेळ आली. मेहनतीने मिळविलेल्या 'ट्रॉफी' आणि सन्मानचिन्हांचीही विक्री करण्याची वेळ आली. 

बिझनेस आणि उद्योग क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे► क्लिक करा

आपण घ्यावयाचे धडे : आपण काय शिकणार? 
1. कितीही पैसा कमावला तरी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे हे आर्थिक संकटाला निमंत्रण देते.
2. कर्जाची परतफेड चुकवणे हे धोकादायक आहे. परिणामी वाढलेल्या व्याजामुळे परतफेड करावयाची एकूण रक्कमदेखील वाढत जाते.
3. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेल्या बचतीला वेळेआधी कधीही हात घालू नका.
4. आर्थिक नियोजनाअभावी प्रचंड पैसा कमावून देखील दिवाळखोरी.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com