Paysharp News : चेन्नईच्या स्टार्टअपला RBIकडून मिळाले पेमेंट ऍग्रीगेटरचे लायसन्स

कंपनीने नुकतीच याबाबत माहिती दिली.
Paysharp News
Paysharp Newssakal
Updated on

फिनटेक स्टार्टअप पेशार्पला (Paysharp) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) पेमेंट ऍग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. कंपनीने नुकतीच याबाबत माहिती दिली.

आता आमच्या प्रॉडक्ट्सची क्षमता सुधारण्यास मदत होईल आणि देशातील लाखो SMEs आणि लहान व्यवसायांचे फायनांशियन ऑपरेशन ऑटोमेट करण्यासाठी नवीन दृष्टिकोन विकसित होईल असे कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ कृष्ण कुमार मणी म्हणाले. (Fintech startup Paysharp has received an in principle authorisation from the Reserve Bank Of India to act as a payment aggregator)

कृष्ण कुमार मणी आणि सतीश एस यांनी 2019 मध्ये एकत्र पेशार्प (Paysharp) सुरू केले. हा एक B2B स्टार्टअप आहे जो व्यवसायांना त्यांची एंटरप्राइझ-ग्रेड व्हर्च्युअल खाती किंवा युपीआय सिस्टीम त्यांच्या सॉल्यूशएन किंवा मोबाइल ऍप्ससह एकत्र जोडतो.

Paysharp News
Indian Economy : RBI चे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांचे सूचक वक्तव्य; पुढील 20 वर्षात भारत...

पेशार्प ही ब्रँडेड युपीआय हँडल आणि कस्टमायझेशनसह कंप्लिट कलेक्शन सॉल्यूशन ऑफर करते ज्यात मोबाइल इंटेंट, कलेक्शन रिक्वेस्ट आणि डायनॅमिक क्यूआर कोडसह सर्व युपीआय पेमेंट पर्याय दिले गेलेत. पेमेंट गेटवेव्यतिरिक्त पेशार्प बिलर्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑन-बोर्डिंग करण्यासाठी BBPS (भारत बिल पेमेंट सर्व्हिस) सॉल्यूशंसही देतो.

पेशार्प शिवाय आरबीआयने डिजिटल पेमेंट प्रोसेसिंग फर्म वर्ल्डलाइन ईपेमेंट्स इंडियालाही (Worldline ePayments India) पेमेंट ऍग्रीगेटर म्हणून तत्वतः मान्यता दिली आहे. ओपन (Open), इन्फिबीम (Infibeam) आणि कॅशफ्रीसह (Cashfree) अनेक फिनटेक कंपन्यांनाही गेल्या तीन महिन्यांत पेमेंट ऍग्रीगेटर परवान्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com