Indian Economy : RBI चे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांचे सूचक वक्तव्य; पुढील 20 वर्षात भारत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Economy

Indian Economy : RBI चे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांचे सूचक वक्तव्य; पुढील 20 वर्षात भारत...

Indian Economy : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर सी रंगराजन म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सतत 8-9 टक्के विकासदर राखावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पण रंगराजन म्हणतात की, भारत पुढील 20 वर्षांत हे स्थान गाठू शकेल, पण त्यासाठी सतत उच्च विकास दर राखावा लागेल. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स झाल्यावरच भारत कमी-मध्यम उत्पन्न असलेला देश म्हणून गणला जाईल.

'आयसीएफएआय फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशन'च्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना रंगराजन म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवणे हे नजीकच्या काळातील महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. भारताला उच्च मध्यम उत्पन्नाचा देश होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ते म्हणाले, 'विकसित देश होण्यासाठी भारताचे दरडोई उत्पन्न किमान 13,205 डॉलर असले पाहिजे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देशाला दोन दशकांहून अधिक काळ आठ ते नऊ टक्के इतका विकासदर राखावा लागेल.

रंगराजन म्हणाले की, एकूण उत्पादनाच्या बाबतीत भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मानांकनानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत 197 देशांपैकी 142 व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

सरकारला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना, RBI चे माजी गव्हर्नर म्हणाले, "5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. मात्र, हा पराक्रम साधण्यासाठी नऊ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ किमान पाच वर्षे राखावी लागेल. देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यावरून हे देखील दिसून येते की आपल्याला वेगाने प्रगती करावी लागेल.''