रुपयाचे ऐतिहासिक घसरगुंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - परकी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा लावत पैसे काढून घेतल्याने गुरुवारी चलन बाजारात रुपया गडगडला. आज डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 49 पैशांचे अवमूल्यन झाले आणि रुपयाने प्रथमच 69.10 ची नीचांकी पातळी गाठली. दिवसअखेर तो 68.79 वर बंद झाला. कमुकवत रुपयामुळे सरकारचा आर्थिक समतोल बिघडणार असून, आयातीवरील वाढीव खर्चाने महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. 

खनिज तेलाच्या वाढत्या भावांनी रुपयावरील दबाव वाढला आहे. बॅंका, तेल आयातदार कंपन्यांकडून डॉलरला मागणी आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून रुपयाला सावरण्यासाठी कोणतीही उपाययोजना न झाल्याने रुपयातील पडझड कायम आहे. काल (ता.27) रुपयात 37 पैशांचे अवमूल्यन झाले होते. आज आणखी 49 पैशांच्या अवमूल्यनाने तो 69 च्या पातळीखाली गेला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाले आहेत, मात्र रुपयाच्या अवमूल्यनाने त्याचा फायदा भारतीयांना मिळणार नाही. औद्योगिक वापरातील धातूंसाठी रुपयाच्या अवमूल्यनामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ""आखाती देशांतील अनिश्‍चित राजकीय परिस्थितीने खनिज तेलाच्या भावामध्ये प्रचंड चढ-उतार होत आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताच्या तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ होऊन महागाईचा भडका उडेल,'' असा अंदाज आनंद राठी कमोडिटीजचे विश्‍लेषक ऋषभ मारू यांनी व्यक्‍त केला. 

परकी गुंतवणूकदारांची "एक्‍झिट' 
अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध, खनिज तेलाचे भाव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेची प्रगती यामुळे परकी गुंतवणूकदार भारतीय बाजारांमधील गुंतवणूक कमी करत आहेत. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू वर्षात आतापर्यंत शेअर आणि कर्जरोख्यांमधून तब्बल 46 हजार 600 कोटी काढून घेतले आहेत. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला. 

पर्यटनासाठी जादा पैसे 
विदेशी जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना रुपयाच्या अवमूल्यनामुळे डॉलरसाठी जादा पैसे मोजावे लागतील. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढणार आहे. अवमूल्यनामुळे विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च वाढून त्यांची डोकेदुखीही वाढणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time reached the lowest level