फिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट

वृत्तसंस्था
Friday, 22 March 2019

नवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था फिचने सांगितले आहे. येत्या 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक विकासदरातील वाटचाल 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याअगोदर भारताच्या विकासदरवाढीचा अंदाज 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये विकासदर 7.10 टक्के राहण्याची शक्यता आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेने फेब्रुवारी 2019 मध्ये केलेली 0.25 टक्क्य़ांची दर कपात विकास दरात वाढ राखणारी ठरेल, असे नमूद करत पतमानांकन संस्थेने पुढील कालावधीत देशातील बँकांची वित्तस्थिती सुधारेल, असेही म्हटले आहे.  येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेकडून आणखी दर कपात होण्याची शक्यता देखील फिचकडून वर्तविण्यात आली आहे. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सरकारने राबविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fitch cuts India GDP growth forecast for FY20 to 6.8 pct