एकाच वर्षात पाचपट नफा, तुम्हाला माहितेय का हा शेअर ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

एकाच वर्षात पाचपट नफा, तुम्हाला माहितेय का हा शेअर ?

मुंबई : विडली रेस्टॉरंट्स (Vidli Restaurents) या रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या कंपनीने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदारांसाठी हा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. विडली रेस्टॉरंट्सचे शेअर्स यावर्षी 430 टक्क्यांनी वाढले आहेत.

विडली रेस्टॉरंट्स ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 52.56 कोटी आहे. 2016 साली बीएसई एसएमईवर हे शेअर्स लिस्ट झाले होते. 1.31 कोटी रुपयांच्या आयपीओअंतर्गत कंपनीचे शेअर्स 10 रुपयांच्या किंमतीला होते.

एका वर्षात एका लाखाचे 5 लाख

विडली रेस्टॉरंटचे शेअर्स एका वर्षापूर्वी 1 ऑक्टोबर 2021 रोजी 9.16 रुपयांवर होते. पण आता हेच शेअर्स बीएसईवर 48.55 रुपयांवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ फक्त एका वर्षात त्याचे शेअर्स 5.30 पटीने मजबूत झाले आहेत, म्हणजे त्या वेळी एखाद्याने विडलीमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 5.30 लाख रुपये झाले असते.

2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीला 39.6 लाख रुपयांचा महसूल आणि 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. एका आर्थिक वर्षापूर्वी 2020-21 मध्ये कंपनीला 26.2 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock