Share Market: एका लाखाचे 4 कोटी, एका रुपयापेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची भरारी...

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक (Flomic Global Logistics) ही एक लहान मार्केट कॅप असलेली कंपनी आहे ज्याचे मार्केट कॅप सुमारे 106 कोटी आहे
Share Market
Share Marketesakal

शेअर बाजारातील छोट्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे तसे धोकादायक मानले जाते, पण काही छोट्या कंपन्यांनी गुंतवणुकदारांना तगडा परतावा दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक (Flomic Global Logistics) ही अशीच एक कंपनी आहे, जिने अवघ्या साडेतीन वर्षात हजारो पट परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक (Flomic Global Logistics) ही एक लहान मार्केट कॅप असलेली कंपनी आहे ज्याचे मार्केट कॅप सुमारे 106 कोटी आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 28 मार्च 2019 रोजी त्याचे शेअर्सने पहिल्यांदा ट्रेडिंग सुरू केले, त्यावेळी त्याची फेस व्हॅल्यू एका रुपायापेक्षाही कमी अर्थात 0.35 रुपये होती. किमान दोन वर्षे, ते पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. पण यानंतर शेअर्समध्ये आलेल्या तेजीने सर्व दिग्गज कंपन्यांना मागे टाकले.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकचे शेअर्स मंगळवारी 147.25 रुपयांवर बंद झाले, जे साडेतीन वर्षांपूर्वी फक्त 0.35 पैशांना होते. म्हणजेच गेल्या साडेतीन वर्षांत त्याची किंमत सुमारे 41,971.43 टक्क्यांनी वाढली आहे.

Share Market
Share Market: शेअर बाजारात दिवसभरात तेजी; सेन्सेक्स 156 तर निफ्टी 57 अंकांवर

एखाद्या गुंतवणूकदाराने 28 मार्च 2019 रोजी फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 4.20 कोटी रुपये झाली असती. एवढेच नाही तर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये फक्त 25 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 25 हजार रुपयांची किंमत 1 कोटी 5 लाख रुपये झाली असती.

Share Market
Tata Group च्या 'या' शेअरने सात पट नफा, आणखी होणार तेजी

गेल्या 1 महिन्यात त्याचे शेअर्स सुमारे 5 टक्के वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 3 महिन्यांत त्याचे शेअर्स सुमारे 50 टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या 1 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 35.28 टक्के परतावा दिला आहे.

Share Market
Share Market : आयकीओ लाइटनिंग कंपनीचा आयपीओ, सेबीकडे कागदपत्र सादर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com