esakal | परकी गुंतवणूकदारांची गुंतवणूक घटली 
sakal

बोलून बातमी शोधा

परकी गुंतवणूकदारांची गुंतवणूक घटली 

परकी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणुकीमुळे आणि कोरोनाच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या घबराटीने सेन्सेक्‍सने मागील तिमाहीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदविली. 

परकी गुंतवणूकदारांची गुंतवणूक घटली 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोविड 19 उद्रेकाचा इतर क्षेत्रांप्रमाणेच बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याच्या शक्‍यतेने परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) बॅंका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपन्यांमधील (एनबीएफसी) भागभांडवल मोठ्या प्रमाणात काढून घेतले. परिणामी जानेवारी ते मार्च तिमाहीत या कंपन्यांमधील तब्बल 4 टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक घटली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परकी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणुकीमुळे आणि कोरोनाच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या घबराटीने सेन्सेक्‍सने मागील तिमाहीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदविली. मागील तिमाहीत सेन्सेक्‍स तब्बल 28.6 टक्‍क्‍यांनी घसरला होता. तर निफ्टीमध्ये 29.3 टक्‍क्‍यांची घसरण होऊन 1992 नंतर पहिल्यांदाच कोणत्याही एका तिमाहीत होणारी ही सर्वात मोठी घसरण होती. महत्वाचे म्हणजे परकी गुंतवणूकदारांनी बॅंकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेतल्याने बॅंक निफ्टी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक अनुक्रमे 40.5 आणि 36 टक्‍क्‍यांनी घसरला होता. 

परकी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणुकीचा सर्वाधिक फटका एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, ऍक्‍सिस बॅंक आणि बंधन बॅंक या प्रमुख कंपन्यांना बसला आहे. परकी गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमधून 100 ते 300 बेसिस पॉइंट्‌सने गुंतवणूक कमी केली आहे. तर जम्मू आणि काश्‍मीर बॅंकेतून तब्बल 402 बेसिस पॉइंट्‌सने गुंतवणूक कमी झाली आहे. तर अनेक वित्त संस्थांनी आपली आकडेवारी जाहीर केलेली नाही. 

परकी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणुकीमुळे अनेक मोठ्या बॅंका आणि वित्तीय संस्थांचे शेअर उच्चांकी पातळीपासून 50 टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. 

loading image