फोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला 

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता एकमेकांवर 
हाणामारी केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोर्टिस हेल्थकेअरमध्ये सिंग बंधूंमध्ये वाद सुरु होते. आता मात्र ते वाद अधिक चिघळल्याने कंपनीच्या कामकाजावर परिणाम होत असून गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली आहे. 

मालविंदर सिंग यांनी त्यांचे बंधू शिविंदर सिंग यांच्यावर हाणामारी केल्याचा आरोप केला आहे. 5 डिसेंबरला दिल्लीतील हनुमान रोड येथील कंपनीच्या बैठकीत शिविंदर सिंग सदस्य नसताना देखील घुसला आणि मारहाण केली. या बैठकीत गुरुविंदर धिल्लोन यांना दिलेल्या 2000 कोटींच्या कर्जावर चर्चा सुरु होती. बैठकीदरम्यान दोनी बंधुंमध्ये हाणामारी झाल्याने मालविंदर यांच्या हाता-पायाला आणि गुडघ्याला मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिविंदर सिंग यांनी मालविंदरवर यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. शिविंदर म्हणाले की, 'मी नाही तर मालविंदरनेच मला मारले असून त्यामुळे मला जखमा झाल्या आहेत. मी पोलिसांत त्याची तक्रार करणार होतो. पण माझ्या नातलगांनी मला थांबवल्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही.' 

सध्या मुंबई शेअर बाजारात फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर 147.10 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानूर कंपनीचे 11 हजार 090.15 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fortis feud: Singh brothers fight turns nasty, Malvinder alleges Shivinder attacked him