esakal | Petrol-Diesel Price Update : पेट्रोल-डिझेलचे दर 8.5 रुपये कमी होण्याची शक्यता

बोलून बातमी शोधा

petrol.jpg}

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. विरोधी पक्षांकडून दररोज केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांविरोधात आंदोलने केली जात आहेत.

Petrol-Diesel Price Update : पेट्रोल-डिझेलचे दर 8.5 रुपये कमी होण्याची शक्यता
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. विरोधी पक्षांकडून दररोज केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांविरोधात आंदोलने केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. आगामी काळात सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 8.5 रुपये प्रति लीटरपर्यंत कपात करण्याची शक्यता आहे. ही कर कपात केल्यानंतरही सरकारच्या महसूलावर परिणाम होणार नसल्याचा दावा, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या एका अहवालात केला आहे. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

इंधनाच्या दरात सर्वांत मोठा हिस्सा हा टॅक्सचा म्हणजेच कराचा असतो. पेट्रोलच्या दरात सुमारे 60 टक्के आणि डिझेलमध्ये सुमारे 54 टक्के हिस्सा हा केंद्र आणि राज्यांच्या कराचा आहे. उदा. दिल्लीत पेट्रोल सुमारे 91 रुपये प्रति लीटर मिळते. यामध्ये सुमारे 54 रुपये कर आहे. केंद्र सरकार यावर एक्साइज ड्यूटी म्हणजेच उत्पादन शूल्कही आकारते. तर राज्य सरकारांकडून व्हॅट किंवा विक्रीवर कर लागू केला जातो.

हेही वाचा- खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

त्यामुळे आता सर्वच बाजूने कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. सरकार यावर विचार करत असून 15 मार्चनंतर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे नुकताच 'रॉयटर्स'च्या एका अहवालात अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला होता. 

काय म्हटलंय अहवालात
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या एका अहवालत म्हटले आहे की, आमचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वाहन इंधनावर जर एक्साइज ड्यूटीमध्ये काही कपात केली नाही तर ही रक्कम 4.35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. तर अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार 3.2 लाख कोटी रुपये आहे. या हिशोबाने जर एक एप्रिल 2021 किंवा त्याच्या आधी उत्पादन शूल्कात 8.5 रुपये प्रति लीटरची कपात केली तर पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार प्राप्त केला जाईल. 

हेही वाचा- दरवाढीमुळे खरेदीदार धास्तावले, देशातील इंधन खपाचे आकडे होतायत कमी

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अपेक्षा व्यक्त केली आहे की, मागणीत सुधारणा आल्याने, खासगीकरणाला प्रोत्साहन देणे आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक्साइज ड्यूटीमध्ये कपातीची शक्यता आहे. परंतु, ही कपात 8.5 रुपये प्रति लीटरपेक्षा कमी राहू शकते. मागील वर्षी मार्चपासून ते मे 2020 दरम्यान पेट्रोलवर उत्पादन शूल्कात 13 रुपये आणि डिझेलमध्ये 16 रुपये लीटरची वाढ झाली आहे.