इंधनदरातील कपात सुरूच

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली. त्यामुळे आज पेट्रोल १९, तर डिझेल आणखी २० पैशांनी स्वस्त झाले. 

नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली. त्यामुळे आज पेट्रोल १९, तर डिझेल आणखी २० पैशांनी स्वस्त झाले. 

आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ६८.६५ रुपयांवर आला असून, मुंबईत त्याची ७४.३० रुपये दराने विक्री सुरू आहे. डिझेल दरात झालेल्या २० पैशांच्या कपातीनंतर दिल्लीत त्याचा दर ६२.६६ रुपये, तर मुंबईत ६५.५४ रुपयांवर आला आहे. दरम्यान, चेन्नई व कोलकाता शहरात पेट्रोलचा दर अनुक्रमे ७१.२२ आणि ७०.७८ रुपये असून, एक लिटर डिझेलसाठी या शहरांतील ग्राहकांना अनुक्रमे ६६.१४ व ६४.४२ रुपये मोजावे लागत आहेत.

गेल्या तीन महिन्यांत वेळोवेळी झालेल्या कपातीमुळे पेट्रोल १५ रुपये, तर डिझेल १३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, इंधनदरात सुरू असलेली कपात आणखी काही दिवस सुरू राहण्याचा अंदाज आहे.

विमानाचे इंधन पेट्रोल, डिझेलपेक्षाही स्वस्त
जागतिक बाजारपेठेत विमानाच्या इंधनदरात (एटीएफ) झालेली घसरण पाहता मंगळवारी त्यात १४.७ टक्‍क्‍यांची कपात करण्यात आली. त्यामुळे हे इंधन पेट्रोल व डिझेल दराच्या तुलनेत स्वस्त झाले आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कपात ठरली असून, भारतात हे इंधन एकूण ९.९९० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचा दर ५८,०६०.९७ रुपयांवर आला असून, यापूर्वी १ डिसेंबर रोजी इंधनदरात प्रति किलो लिटरमागे १०.७ टक्के कपात करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel Rate Decrease