पुण्यात 'सेकंड हॅन्ड कार'ची विक्री जोरात (व्हिडिओ)

टीम ईसकाळ
Tuesday, 25 June 2019

पुणे: कारदेखो गाडीचे आज पुण्यात चार स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईनंतर पुणे महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुण्यात 'सेकंड हॅन्ड' वाहनांच्या विक्रीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कारदेखो गाडी ब्रॅण्ड ग्राहकांना कोणत्याही तसदीविना वाहन विक्रीचा अनुभव देण्यासाठी पुण्यात आता नवीन स्टोअर सुरु करण्यात आले आहे.  ब्रॅण्ड वाहनांसाठीसाठी अधिकतम 'रिसेल मूल्य' देऊन ग्राहकांना आरसी हस्तांतरण, लोन क्लोज करण्यामध्ये सहाय्य, त्वरित पैसे हस्तांतरण आणि वाहनांची पद्धतशीर तपासणी करण्यासाठी मदत करणार आहे. 

 कारदेखोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित जैन म्हणाले, ''कारदेखोने दशकापूर्वी एक ऑनलाइन ऑटोमोबाइल कंपनी म्हणून प्रवास सुरू केला. आज  देशातील विश्वसनीय ऑटो ब्रॅण्ड समावेश झाला आहे. पुण्यामध्ये कारदेखो गाडी स्टोअर्सचे सादरीकरण ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेचा एक भाग आहे.''

 गाडीचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर सहारे म्हणाले, ''आम्ही युज्ड कार इको-प्रणालीचा सखोल अभ्यास केला असून ग्राहकांना त्यांच्या कार्सची सुलभपणे विक्री करण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही भारतात युज्ड कार्सच्या विक्रीसाठी एक विश्वसनीय व्यासपीठ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.''

 मॅककिन्से अॅण्ड कंपनीच्या अभ्यासानुसार भारतातील युज्ड-कार्स विभाग सतत प्रगती करत राहिल. भारत  2021 पर्यंत युज्ड कार्ससाठी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनण्याची शक्यता आहे. फोकस आणि उत्सर्जन व सुरक्षिततेसंदर्भातील कडक नियमांमुळे लोक नवीन गाडी खरेदी करताना सावधगिरी बाळगत आहेत. याच धर्तीवर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चुरर्स (एसआयएएम) म्हणते की, 'गाडी'सारख्या ऑनलाइन व्यासपीठांच्या वाढत्या संख्येसह बाजारपेठ विकासाला झपाट्याने चालना मिळेल. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaadi Now Has 4 Stores In Pune