'या' शेअर्समुळं तुम्ही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या सविस्तर

यावर्षी बाजारात डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळतेय.
Share Market
Share MarketSakal

मुंबई : यावर्षी बाजारात डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळतेय. याच काळात शेअर्सच्या दरात चांगली वाढ देखील आपण अनुभवतोय. त्यामुळेच तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर ब्रोकरेज हाऊसच्या पसंतीच्या शेअर्सवर नजर ठेऊ शकता. (gail petronet LNG SBI cards top stocks by brokerage house for investment)

Share Market
"राहुल गांधींनी ठाकरेंना पेट्रोलवरील कर कमी करायला सांगावं"

'शॉर्ट टू मिड टर्म' गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स :

शेअर बाजारात १० जूनच्या सत्रात चांगली तेजी पाहायला मिळाली. यावर्षी बाजारात डबल डिजिट ग्रोथ असल्यानं, याच काळात शेअर्सच्या दरात चांगली वाढ देखील अनुभवायला मिळते आहे. त्यामुळेच तुम्ही गुंतवणुकीसाठी शेअर्सच्या शोधात असाल तर ब्रोकरेज हाऊसच्या पसंतीच्या शेअर्सवर नजर ठेऊ शकता. ब्रोकरेज हाऊस कोणत्याही कंपनीचा रिसर्च करून आणि रिस्क फॅक्टर लक्षात घेऊन नंतरच गुंतवणुकीचा सल्ला देतात. म्हणूनच अशा कंपन्यांमधील गुंतवणुकीत जोखीम कमी आणि परताव्याची जास्त शक्यता असते.

ब्रोकरेज हाऊसेसच्या पसंतीचे टॉप पिक्स

GAIL

ब्रोकरेज हाऊस जे पी मॉर्गनने नॅचरल गॅस प्रोसेसिंग आणि डिस्ट्रीब्यूशन करणारी कंपनी गेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी टार्गेट 197 रुपये ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टनुसार, पहिल्या कंपनीचा पेटकॅम व्यवसायाचा एबीट लॉस 3 टक्के इतका होता. मार्च तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली राहिली. इतर मिळकती आणि खर्चात कपात यामुळे गेलचा नफा वाढला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 1487 कोटी वरून 1908 कोटीच्या जवळपास राहिला. दुसरीकडे जेफरिजने गेलच्या शेअर ला होल्ड करण्याचा सल्ला देऊन टार्गेट 150 रुपये केलं आहे.

Share Market
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं कुठं म्हटलं?- संजय राऊत

Petronet LNG (पेट्रोनेट एलएनजी)

ब्रोकरेज हाऊस CSLA ने Petronate LNG चे शेअर्स घेण्याचा सल्ला देत, याचं टार्गेट 270 रुपये निश्चित केलं आहे. ब्रोकरेज हाऊसच्या सांगण्यानुसार, Petronate LNG च्या समभागांचे मूल्यांकन अत्यंत आकर्षक आहे. दुसरीकडे ब्रोकरेज हाऊस सिटी ने याच शेअरला न्युट्रल रेटिंग दिली आहे आणि टार्गेट 325 पेक्षा कमी करून 260 रुपये केलं आहे. तर क्रेडिट सुईस ने आऊटपरफॉर्मचे रेटिंग देऊन टार्गेट 270 निश्चित केलं आहे.

SBI Cards (एसबीआय कार्डस्)

ब्रोकरेज हाऊस क्रेडिट सुईस ने या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत याचं टार्गेट 1200 इतकं निश्चित केलं आहे. येत्या काळात कंपनीचा क्रेडिट कास्ट वाढू शकतो असं ब्रोकरेज कंपन्यांचं म्हणणं आहे. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कंपनीच्या मार्जिनवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या आणि येत्या आर्थिक वर्षात ईपीएसमध्ये 8 टक्के कपातीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(टीप : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com