esakal | "राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना पेट्रोलवरील कर कमी करण्यास सांगावं"
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi-Uddhav Thackeray

"राहुल गांधींनी ठाकरेंना पेट्रोलवरील कर कमी करायला सांगावं"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरुन केंद्रावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावं, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Rahul Gandhi should instruct Uddhav Thackeray to reduce taxes on Petrol says Dharmendra Pradhan)

यावेळी एका पत्रकारानं प्रधान यांना प्रश्न विचारला की, राहुल गांधींनी आरोप केला आहे की देशात इंधनाचे दर वाढतच आहेत, यावर भाजप सरकार लगाम लावू शकलेली नाही. यावर आपलं काय म्हणणं आहे? यावर उत्तर देताना प्रधान म्हणाले, "राहुल गांधींनी अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करु नयेत. पहिल्यांदा त्यांनी याचं उत्तर द्यावं की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये जसे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का आहेत? जर राहुल गांधी यांना गरीबांचा इतकाच कळवळा असेल तर त्यांनी ज्या महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत तिथले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलवरील कर कमी करण्याच्या सूचना कराव्यात"

हेही वाचा: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं कुठं म्हटलं?- संजय राऊत

प्रधान पुढे म्हणाले, "मला मान्य आहे की सध्या इंधनाचे दर वाढलेले दर हे लोकांसाठी अडचणीचे बनले आहेत. पण केंद्र आणि राज्य सरकारांनी ३५,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम या वर्षी लशीकरणासाठी खर्च केली आहे. गरीबांना पंतप्रधानांनी कल्याणकारी योजना जाहीर केल्या, या अशा कठीण प्रसंगात पैसा खर्च करण्यासाठी तो साठवून ठेवणंही गरजेचं आहे."

loading image
go to top