
Gautam Adani : हिंडेनबर्ग वादात गौतम अदानींच्या मुलाची उडी; म्हणाला, कर्जाची परतफेड...
Gautam Adani News : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कंपनीने आपली प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अदानींच्या मोठ्या कर्जाच्या ओझ्याचा वारंवार उल्लेख केला जात आहे, तिथे आता कंपनी कर्जाची परतफेड करून कर्जाचा बोजा कमी करत आहे. कंपनीच्या या पाऊलामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.
सोमवारी, कंपनीने तारण ठेवलेल्या समभागांची पूर्तता करण्यासाठी 1.11 अब्ज डॉलर किंमतीच्या कर्जाची परतफेड करण्याचे जाहीर केले आहे. आता गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यानेही अदानी पोर्ट्सबाबत मोठी घोषणा केली आहे.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सीईओ करण अदानी यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, आम्ही मार्च 2024 पर्यंत सुमारे 5000 कोटींचे कर्ज भरत आहोत.
ते म्हणाले की, आम्ही प्रीपेमेंटसाठी योजना तयार करत आहोत. कंपनीचे संचालक आणि सीईओ करण अदानी यांनी मंगळवारी हा व्हिडिओ संदेश जारी केला. कर्जाचा बोजा कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, कर्जाच्या पूर्व पेमेंट करण्या व्यतिरिक्त, आम्ही आर्थिक वर्ष 2024 मध्ये अदानी पोर्ट्स कॅपिटल एक्स्पेंडिचर म्हणून 4000 ते 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत.
विशेष म्हणजे करण अदानी यांनी ही घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा हिंडेनबर्ग अहवालामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
एवढेच नाही तर कंपनीला आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ काढून घ्यावा लागला. अदानीचे शेअर्स मंगळवारी परतले असले तरी. त्याचवेळी रेटिंग एजन्सी मूडीज-फिचने अदानी समूहाच्या कर्जाबाबत मोठे विधान केले आहे.
अदानीच्या कर्जाबाबत मूडीज आणि फिच या दोघांनीही आपले अहवाल दिले आहेत. जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सी फिच आणि मूडीज यांनी मंगळवारी सांगितले की, अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला कोणताही धोका निर्माण करण्याइतकी जास्त नाहीत.